कारण मोमोज हा पदार्थ मैद्याच्या सहाय्याने बनवला जातो. जो परिष्कृत तंत्रज्ञानाद्वारे गव्हाच्या पिठापासून तयार केला जातो.
मोमोज बनविण्यासाठी तयार केलेल्या सारणात वापरलेल्या भाज्या आणि सॉस निकृष्ट दर्जाचे असल्यास पोटाचे विकार होऊ शकतात .
मोमोजमध्ये घातक कोलिफॉर्मचे प्रमाण खूप जास्त आहे. असे स्ट्रीट फूड खाल्ल्याने अतिसार, टायफॉइड, पोटदुखी आणि अन्नातून विषबाधा होण्याचा धोका वाढतो.
परंतु बनविणाऱ्याने कोणत्या प्रकारचे मसाले आणि तंत्र वापरले आहे यावर त्याचा फायदा वा तोटा अवलंबून असतो.
अति प्रमाणात मोमोज खाण्याच्या सवयीमुळे तुम्हाला लवकर मधुमेह, लठ्ठपणा होऊ शकतो.
जर मोमोज खायचे असतील तर ते स्वतः घरी बनवा आणि मग खा.