घाटी मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी वेबिनार: सुनील केंद्रेकर यांनी मांडल्या भावना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : घाटीच्या वार्धक्यशास्त्र (जिरीयाट्रीक्स) विभाग आणि ‘आयएमए’ औरंगाबादतर्फे ज्येष्ठ नागरिकांवर होणाऱ्या गैरवर्तनाच्या जनजागृती दिनानिमीत वेबीनार घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख वक्ते विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी जेष्ठांना याचक म्हणून वागणूक न देता सन्मानपुर्वक जी होईल ती मदत करायला हवी असे मत व्यक्त केले.

सध्या भारतातील वृद्धांची संख्या १० ते १२ कोटी असून येत्या २० वर्षात ती दुप्पट होईल, असा अंदाज असून आतापासूनच ज्येष्ठांच्या शारीरीक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेऊन पुढील नियोजन करायला हवे, असे ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. संतोष रंजलकर यांनी सांगितले. केअर होम याशिवाय त्यांचे आधार – कार्ड काढून देणे, पोषण, शासनाच्या इतर योजनांचा त्यांना लाभ मिळेल यावर भर देण्यात येईल तसेच त्यांना घरी बसल्या वाळवण करणे, वाती वळणे आदी छोटे व्यवसाय करता आले. तर त्यासाठी शासन सहकार्य करेल असेही त्यांनी सांगितले.

वार्धक्यशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. मंगला बोरकर यांनी जेष्ठासोबतच्या मानसिक, आर्थिक, शारीरीक समस्यांबाबत माहिती दिली. डॉ. नरेंद्र वैद्य यांनी वृद्धाश्रम न म्हणता जेष्ठघर म्हणावे आणि त्यांना तेथे कुटुंबासारखे वातावरण निर्माण करून उर्वरित आयुष्य चांगले कसे जगता येईल याविषयी माहिती दिली. नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सामाजिक स्तरापासून वेगवेगळ्या कायद्याची मदत घऊन जेष्ठांवर होणारे गैरवर्तन कसे रोखता येईल याविषयी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन वार्धक्यशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलजा राव यांनी केले. यासाठी डॉ. महेश पाटील, डॉ. आशीष राजन, डॉ. झेबा फिरदोस, डॉ. श्रुती कर्णिक, डॉ. साधना जायभाये, डॉ. पंकज महाजन, डॉ. मिलींद खाडे, डॉ. केहकशा फारुकी, डॉ. मोमिन आयेशा आणि श्री. बोधनकर यांनी सहकार्य केले.

Leave a Comment