धक्कादायक! प. बंगाल निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा कोरोनामुळे मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकत्ता : देशभर कोरोनाच्या साथीने कहर केला आहे. अशातच पश्चिम बंगाल मध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यादरम्यान कोरोनामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी कोलकत्यातील एका रुग्णालयात त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. ते मुर्शिदाबाद मधील शमशेर गंज विधानसभा मतदार संघातून उमेदवार होते. याबाबतची माहिती पश्चिम बंगाल काँग्रेसचे सचिव रोहन मित्रा यांनी ट्विट करत दिली आहे.

काँग्रेसचे सचिव रोहन मित्रा यांनी माहिती दिली आहे की, ‘ कोरोना मुळे शमशेर गंज मधून काँग्रेसचे उमेदवार ‘रझाऊल हक’ यांचा मृत्यू झाला. आता ही वेळ अधिक सजग राहण्याची आहे. आपण जिवंत राहू आणि पुढील वर्षाचे कॅलेंडर पाहण्यासाठी महासाथीमधून स्वतःचा बचाव करण्यासाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे’ असं रोहन मित्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर ते कोलकत्यातील एका रुग्णालयात भरती झाले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात गेल्या चोवीस तासात सहा हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मंगळवारी एकूण 42 हजार 214 नमुन्यांची तपासणी केली. त्यापैकी 4817 जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं. यावेळी 2278 बढितांनी कोरोनावर मात केली. पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत 5लाख 84 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment