निवडणुकीनंतर प. बंगालमध्ये लॉकडाऊन लागू; अनिश्चित काळासाठी मॉल्स, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आदी गोष्टी राहणार बंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम बंगाल सरकारने कोविड १९ च्या अनुषंगाने राज्यात निर्बंध लागू केले आहेत. विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर प. बंगाल सरकारने राज्यात कडक निर्बंध लावले आहेत. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने सरकारने सदर पाऊल उचलले आहे.

नवीन निर्बधांनुसार, शॉपिंग कॉम्प्लेक्स, मॉल्स, ब्युटी पार्लर, सिनेमा हॉल, रेस्टॉरंट्स आणि बार, जिम व स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बंद राहणार आहेत. तसेच हे निर्बंध पुढील ऑर्डरपर्यंत लागू राहणार आहेत. सकाळी 7-10 आणि संध्याकाळी 3-5 दरम्यान फक्त बाजारपेठा / हॅट्स उघडे राहणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, भारतात दुसऱ्या लाटेत आढळलेला कोरोनाचा डबल म्युटंट व्हेरियंट जगातील इतर 17 देशांमध्ये आढळला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) मंगळवारी म्हटलंय. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. आज गोव्यातहि लोकडाऊन जाहीर करण्यात आले. तसेच दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी आप आमदाराने केली आहे.

Leave a Comment