लॉकडाऊनबाबत आज काय होणार? मुख्यमंत्र्यांची आज सर्वपक्षीय नेत्यांसोबत बैठक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मागील काही दिवसांपासून कठोर निर्बंध लागू केले जात आहेत. ज्यानंतर सर्व स्तरांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या. राज्यातील कोरोना स्थिती पाहता शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली आहे. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर प्रमुख राजकीय पक्षांच्या नेत्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे ही बैठक पार पडणार आहे. जिथं दहावी – बारावी बोर्डाच्या परीक्षांसंदर्भातही निर्णय़ घेतला जाणार आहे. त्याशिवाय राज्यात सध्या लागू असणारे निर्बंध आणखी कठोर केले जाणार की त्यामध्ये शिथिलता आणली जाणार यासंदर्भात निर्णय होणार आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा उंचावता आलेख पाहता या पार्श्वभूमीवर येत्या काळात तीन आठवड्यांचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय़ प्रशासन घेणार का, यासंदर्भातील धाकधूकही अनेकांनाच लागली आहे. त्यामुळंकाही वेळानंतर होणाऱ्या या सर्वपक्षीय बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागल आहे. राज्यात टाळेबंदीची मुदत वाढवावी आणि त्याची कठोरपणे अंमलबजावणी व्हावी, अशा सूचनाच मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली असून सोबतच मुंबई लोकलबाबतही त्यांनी महत्त्वाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळं आता मुख्यमंत्री यासंदर्भात सर्व पक्षांतील नेत्यांसोबतच्या चर्चेनंतर कोणत्या निर्यणावर पोहोचतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

करोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठीच सरकारने गेल्या सोमवारपासून कठोर निर्बंध लागू केले. जीवनावश्यक वस्तू वगळता अन्य दुकाने ३० तारखेपर्यंत बंद ठेवण्याच्या आदेशावरून व्यापारी वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. राज्यात ठिकठिकाणी व्यापारी रस्त्यावर आले. सोमवारपासून सर्व दुकाने सुरू करण्याचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स या संघटनेने दिला आहे. भाजपने व्यापारी वर्गाला पाठबळ देत त्यांच्या भूमिके चे समर्थन के ले. दुसरीकडे राज्यातील रुग्णसंख्या कमी होत नसल्याने केंद्र सरकारकडून वारंवार कान टोचण्यात येत आहेत. सरकारच्या भूमिके बद्दल टीका होत आहे.

Leave a Comment