वाचनाने आम्हाला काय दिलं? – भाग ६

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भारताचे माजी राष्ट्रपती, महान संशोधक, भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या ८८ व्या जन्मदिवसानिमित्त ग्रामीण भागातील तरुण तरुणींना ‘वाचन’ याविषयी लिहितं केलं. आपल्या आयुष्यात वाचनाचं महत्व काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न तरुणाईने केला. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांपर्यंत त्यांची ही धडपड पोहचवत आहोत.

वाचनामुळे आत्मविश्वास वाढला – ललिता बाळू भोसले

खरचं वाचनाने मला काय दिले यापेक्षा मी वाचनातून काय घेतले हे मी सांगेन. सततच्या वाचनाने माणूस पूर्णपणे बदलून जातो हे खर आहे. वाचनामुळे माझी विचारशक्ती वाढीस लागली. आत्मविश्वास वाढला. मी माझी ठामपणे मत मांडू लागले. सारासार विचार करायला लागले. वाचनामुळे आपण एखादी गोष्टी करायची ठरवली तर आपण ती निश्चितपणे करू शकतो. उच्च शिशणासाठी जिद्द, चिकाटी हे महत्वाचे पैलू आहेत हा विश्वास माझ्यामध्ये आला. खरच वाचनाने मला खूप काही शिकवले आहे. मला याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल. मला अजून खूप पुस्तके वाचायची आहेत. त्यासाठी मी नक्कीच प़यत्न करेन.

WhatsApp Image 2019-10-14 at 23.07.03
ललिता बाळू भोसले, तृतीय वर्ष भौतिकशास्त्र वाय.सी.कॉलेज.सातारा.

पोटाला जेवण नसेल तरी चालेल पण डोक्याला खुराक पाहिजे – ऋतुजा भगवान मोरे

वाचनामुळे विचारांना चालना मिळाली. चांगल वाईट यांतला फरक कळला. आपण जी पुस्तके वाचतो त्यापमाणे आपण घडतो. वाचनाने ञानात भर पडते. समाजातील चांगल्या वाईट गोष्टी कळतात. आपल्या वागण्यातील चांगल्या वाईट गोष्टी कळतात. पोटाला जेवण नसेल तरी चालेल पण डोक्याला खुराक पाहिजे. वाचनामुळे माणूस आयुष्यात प्रगती करू शकतो. वाचनाने शब्द संपत्ती वाढते. पुस्तक हा आपला गुरू असतो कारण आपण ज्या गोष्टी वाचतो त्या आपल्याला बरेच काही शिकवतात. माणसाने आवड जपावी ती वाचनाची.

WhatsApp Image 2019-10-14 at 19.35.19
ऋतुजा भगवान मोरे, तृतीय वर्ष रसायनशास्त्र वाय.सी.कॉलेज, सातारा

अभ्यास करण्याचा स्टॅमिना वाचनाने वाढवला – स्वलिया नासिर मुलाणी

वाचाल तर वाचाल म्हणतात ना ते खरंच. पण बारावीपर्यंत वाचनाची संकल्पना फक्त अभ्यासक्रमातील पाठय पुस्तकं वाचन एव्हढीच मर्यादित होती. पण त्यानंतर वाचन केल्यामुळे अभ्यासात सातत्य राहते हे कुठून तरी ऐकलं होत. अभ्यासात सातत्य वाढवण्यासाठी व जास्त वेळ सतत अभ्यास करण्याचा स्टॅमीना ठीकवण्यासाठी वाचनाला सुरुवात केली. सुरुवातीला फक्त गोष्टीची पुस्तकं वाचली, त्यानंतर मुसाफिर हे मी वाचलेलं पाहिलं पुस्तकं. अच्युत गोडबोले यांचं हे पुस्तकं व त्याचा प्रवास मनात घर करून गेलं. त्यानंतर वाचनाची थोडी थोडी गोडी निर्माण होयला लागली. अभ्यासासाठी चालू केलेले वाचन, कधी त्याचे आवडीमध्ये रूपांतर झाले कळलं नाही. वाचनामुळे विचारांची रुंदी वाढते व नकळत सकारात्मकता निर्माण होते. अनेक मोठ्या व्यक्तींचे संघर्ष व त्यांचा जीवनप्रवास आपल्या आयुष्याला न कळत कलाटणी देऊन जातो.

WhatsApp Image 2019-10-14 at 20.04.17
स्वलिया नासिर मुलाणी वाय.सी.कॉलेज, सातारा

आवड असली की सवड मिळते, वाचनाचंही तसंच आहे – रिंकू हरेराम यादव

वाचनाची आवड निर्माण झाल्यामुळे नवीन गोष्टी शिकण्याची, जाणून घ्यायची जिज्ञासू वृत्ती वाढीस लागली. वेगवेगळ्या पद्धतीने विचार करू लागले. पुस्तक वाचताना त्यातील पात्रांशी एकरूप झाले. पुस्तक वाचताना कल्पना शक्ति वाढीस लागली. वाचन केल्याने सारासार विचार करायला शिकले. वाचनामुळे स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास होत आहे. म्हणतात ना की ,’आवड असली की सवड मिळते.’ अस काहीसं माझ आहे. मला अजून खूप पुस्तक वाचायची आहेत,जेणेकरून ज्ञान वाढेल. सकारात्मक दृष्टीने विचार करायला शिकले.

रिंकू हरेराम यादव
तृतीय वर्ष भौतिकशास्त्र, वाय.सी.कॉलेज, सातारा


इतिहास आणि संस्कृती समजण्यासाठी इतिहासाची मदत – निकिता सतीश महामुनी

जितके अधिक वाचले, तितके आपण आपल्या सभोवतालची माहिती समजतो. आणि जेव्हा आम्ही पुस्तके वाचतो तेव्हा आपण जे काही आधीच ओळखले त्यापेक्षाही आपण जीवन शोधतो. पुस्तके आमच्या शब्दसंग्रह सुधारतात कारण, आमच्या संप्रेषण कौशल्य सुधारणे. वाचन आमच्या भाषा कौशल्ये वाढवते आणि फ्लूच्या विकासास विकसित करते, आम्हाला आपले विचार आणि कल्पना अधिक चांगले व्यक्त करण्याची परवानगी देतात.पुस्तके ज्ञान आमच्या तहान मध्ये क्वचितच पुस्तके, आम्ही गोष्टी कशा प्रकारे कार्य करतो, शिकतो, गोष्टी वेगवेगळ्या संस्कृती समजून घेतात आणि गोष्टींचा इतिहास समजून घेतो. आपण नवीन भाषा शिकू शकतो आणि गोष्टी कशी निर्माण करावी हे योग्य माहिती मिळवू शकतात. योग्य पुस्तके आपल्याला अधिक कुशल आणि नवीन कल्पनांसाठी मदत करतात.

WhatsApp Image 2019-10-15 at 10.21.13
निकिता सतीश महामुनी, बी.एस्सी. भाग १ वाय.सी.कॉलेज, सातारा

वाचनाने मनाची अशांतता घालवण्यास मदत केली – प्रतीक्षा दत्तात्रय थोरात

माणसाच्या जीवनामध्ये पुस्तकांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी पुस्तकांच्या वाचनाने मला मराठी भाषेचे दृढ व्याकरण आणि अलंकारांची ओळख करुन दिली. आपली मराठी किती महान आणि व्यापक आहे हे समजले. पुस्तकांचे नाते मनुष्यासाठी गुरु-शिष्याप्रमाणे आहे. वाचनाने मला माझा शब्द भांडार वाढविण्यास मदत केली. वाचनाने माणूस आत्मनिर्भर आणि प्रगल्भ होतो. वाचनाने माझी एकाग्रता वाढविण्यास मदत केली व त्याचबरोबर मनाची अशांतता घालविण्सास ही मदत केली. समाजात यशस्वी होण्यासाठी वाचनकौशल्य आपल्याकडे असणे आवश्यक आहे. “वाचाल तर वाचाल” हे बोधवाक्य आज खरे ठरले आहे.

WhatsApp Image 2019-10-15 at 10.20.48
प्रतीक्षा दत्तात्रय थोरात.  इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन विभाग.

Leave a Comment