राज्य सरकारवर टीका करण्यापेक्षा केंद्राकडून तुम्ही काय आणलं? बच्चू कडूंचा फडणवीसांना सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आघाडी सरकारकडून राज्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. लसीकरणाबाबत केंद्र सरकारने राज्याला जास्त मदत करावी? अशी मागणीही करत आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारने लसी आणल्यानंतर भाजपचे नेते विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वारंवार राज्य सरकारवर टीका केली जात आहे. यावरून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तुम्ही भाजपचे प्रमुख नेते आहात. राज्य सरकारवर टीका करण्याऐवजी अगोदर तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली का?, त्यांच्याकडे जाऊन लसीबाबत मदत मागितली ? त्यांच्याकडून काय आणलं? एकतरी निवेदन त्यांना दिले का?, याचे अगोदर उत्तर द्यावे.नंतर त्यांनी राज्यसरकारवर टीका करावी'” असा प्रश्न राज्यमंत्री कडू यांनी यावेळी फडणवीसांना विचारला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कोरोनाबाधितांना उपचार घेण्यासाठी रुग्णालयेही ही कमी पडू लागली आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर रुग्णालये सुरु केली जात आहेत. अहमदनगर येथेही प्रहार संघटनेच्यावतीने कोविड सेंटर उभारण्यात आलेले आहे. त्यातून दररोज रुग्णांवर उपचार केले जाताहेत. सेंटरला राज्यमंत्री बच्चू कडू यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी पंतप्रधानमंत्री नरेंद्र मोदी व राज्यातील लसीच्या तुडवड्यामुळे फडणवीसांकडून केल्या जात असलेल्या टिकेबद्दल फडणवीसांवरही जोरदार टीका करीत हल्लाबोल केला.

यावेळी कडू म्हणाले,” राज्य सरकारने केंद्राकडून जादा लसी घेतल्या असल्याचा दावा फडणवीसांकडून केला जात आहे. अशा प्रकारचा दावा करण्याअगोदर फडणवीस आकडे घेऊन बसलात तर तुमच्याही लक्षात येईल कि खरी परिस्थिती काय आहे? तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यावी कि या देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लसीकरणाच्या बाबतीत सर्वात जास्त व्यवस्थापन केलं जातंय. आणि यामुळेच राज्याच कौतुक आज जागतिक पातळीवर केलं जात आहे,” अशी राज्यमंत्री कडू म्हणाले.

Leave a Comment