व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Paytm ला Google ने नक्की का हटविले त्या मागील कारणे जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरमधून भारताचा सर्वाधिक लोकप्रिय फिंटेक अॅप्लिकेशन पेटीएम काढून टाकले. मात्र, प्ले स्टोअरवर काही तासांनंतर पेटीएम पुन्हा रीस्टोअर करण्यात आला. या संपूर्ण घटनेमुळे पेटीएम युझर्सच्या चिंता वाढल्या. पेटीएमने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की,”प्ले स्टोअरची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी cashback component त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून काढून टाकण्यात आला, त्यानंतरच तो प्ले स्टोअरमध्ये परत आला.

पेटीएम प्ले स्टोअरमधून का काढले गेले ?
गुगल प्ले स्टोअरने त्याद्वारे गॅम्बलिंग (जुगार) च्या चालवत असल्याच्या आरोपावरून पेटीएम अॅपला त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून काढले होते. गुगल प्ले स्टोअरने याबाबत म्हटले आहे की,’ते गॅम्बलिंग अॅपला सपोर्ट करत नाही आणि पेटीएमने गॅम्बलिंग-संबंधित धोरणांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना काढण्यात आले.’

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केले आहे की, जर एखादे अॅप एखाद्या युझरला एखाद्या दुसऱ्या वेबसाइटकडे घेऊन गेला ज्यामुळे त्यांना खऱ्या पैशाची किंवा कॅश बक्षिसे जिंकण्यासाठी असलेल्या स्पर्धेत भाग घेण्यास परवानगी मिळाली तर हे त्यांच्या पॉलिसीचे उल्लंघन आहे.

कॅशबॅक हे कारण आहे?
वास्तविक पेटीएमने म्हटले आहे की, ‘Paytm Cricket League’ नुकतीच कंझ्युमर अॅपवर लाँच केली गेली. हा खेळ ग्राहकांना क्रिकेटविषयीची आवड दाखवून कॅशबॅक जिंकण्यासाठी होता. या गेम अंतर्गत, युझरकडून प्रत्येक ट्रान्सझॅक्शनसाठी खेळाडूंचे स्टिकर मिळतात. ते गोळा केल्यानंतर त्यांना कॅशबॅक मिळतो.

याशिवाय गॅम्बलिंगशी संबंधित काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून पेटीएमला गूगलद्वारे अॅपला प्ले स्टोअरवरून काढले जात असल्याची माहितीही देण्यात आली. यामुळे, पेटीएम अँड्रॉइड अॅप गूगल प्ले स्टोअरमधून अनलिस्ट करण्यात आले होते. उद्योग सूत्रांनी सांगितले की,’ गूगल पेटीएम फर्स्ट गेम्सचे नाव न घेताच थेट त्यांच्याकडे लक्ष वेधत आहे, जे Dream 11, HalaPlay, मोबाइल प्रीमियर लीग आणि कित्येक इतरांप्रमाणे फँटसी गेमिंग प्लॅटफॉर्मसाठी आव्हाने आहेत. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगितले की,’ पेटीएमने कॅशबॅक म्हणून दिलेल्या क्रिकेट स्टिकर्समध्ये ही समस्या असल्याचे गुगलने म्हटले आहे. गुगलने सांगितले की, त्यांनी पेटीएम डेवलपर्सशी अनेक वेळा या समस्या शेअर केल्या आहेत. विजय शेखर शर्मा या मुलाखती दरम्यान म्हणाले की,’18 सप्टेंबर रोजी दुपारी फक्त एकच पत्र प्रसिद्ध झाले आणि त्याच दिवशी स्टोअरमधून हे अॅप काढून टाकण्यात आले.’ शर्मा पुढे म्हणाले की,’ गूगलने यापूर्वीच पेटीएम फर्स्ट गेम्सबद्दल चिंता व्यक्त करण्यासाठी तीन पत्रे पाठविली होती. त्यानंतर अलिबाबा आणि सॉफ्टबँक या कंपन्यांनी त्यांचे पालन केलेले आहे.’

शर्मा यांनी असा आरोप केला आहे की,” Google ने आपल्या पेमेंट बिझनेसचा विस्तार वाढवण्यासाठी आपल्या शक्तीचा गैरवापर केला आहे आणि ग्राहकांना आकर्षित करण्याचा चुकीचा प्रयत्न केला आहे.” शर्मा म्हणाले पुढे की,” त्यांच्या कंपनीने काहीही चुकीचे काहीही केलेले नाही. त्यांनी पेटीएमच्या 30 कोटी ग्राहकांना खात्री दिली आहे की, त्यांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. नोटीस देण्यापूर्वी गूगलने पेटीएमवर एकतर्फी कारवाई केली असा दावा त्यांनी केला. या संपूर्ण प्रक्रियेत गूगल स्वतःच जज, एक्जेक्यूशनर आणि बेनिफिशियरी होता.

सुरक्षित आहेत युझर्सचे पैसे
प्ले स्टोअरमधून पेटीएम हटवल्यानंतर, लोकं वॉलेटमध्ये ठेवलेल्या त्यांच्या पैशांबद्दल चिंता करू लागले आणि बर्‍याच युझर्सनी सोशल मीडियावर यावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरवात केली. यावर पेटीएम म्हणाले की,’ ग्राहकांचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि त्यांना पूर्वीप्रमाणेच त्याचा उपयोग करता येईल.’ पेटीएम ही भारतातील सर्वात मूल्यवान स्टार्टअप आहे आणि त्यात दावा केला आहे की, यात 5 कोटी मंथली एक्टिव यूजर्स आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.