फिमेल कंडोम ही भानगड नक्की काय आहे? कसे वापरतात? सुरक्षित असते का? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | कंडोम असे म्हटले की डोळ्यासमोर पुरुषांनी वापरले जाणारे कंडोम येतात. पण महिलांसाठीही कंडोम असतात, असे म्हटले तर बहुतांशी लोकांच्या भुवया उंचावतील. त्यांना प्रश्न पडतील, हे कंडोम कसे असतात, हे कंडोम वापरतात कसे तसेच ते वापरण्यासाठी सुरक्षित असतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता जाणून घेणार आहोत. योग्य आणि सुरक्षितरीत्या वापरल्यास महिलासाठी असलेले हे कंडोम 95 टक्के फायदेशीर ठरत आहेत.

काय आहे फीमेल कंडोम?
पुरुषांसाठी असलेले हे कंडोम आणि इमर्जन्सी काँन्ट्रासेप्टिव्ह पिल्स यांना पर्याय म्हणून फीमेल कंडोम्स बाजारात आले. महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी स्वतः घ्यावी तसेच त्यांनी कोणावर अवलंबून राहु नये, या उद्देशाने फीमेल कंडोमची निर्मिती करण्यात आली.

फीमेल कंडोमचा उपयोग काय?
फीमेल कंडोम चा उपयोग पुरुषांसाठी असलेल्या कंडोमसारखाच आहे. यामध्ये संभोगाच्या वेळी सुटलेले स्पर्म आणि अंडीयांचा मिलाप होत नाही. हे कंडोम एक प्रकारे बॅरियरचे काम करते. योनीच्या आतमध्ये हे कंडोम बसवलेले असते.

कोणत्या मटेरियल पासून हे वापरले बनवले जातात?
हे कंडोम पोलीयूरिथिन, नॅचरल रबर आणि सिंथेटिक रबर यापासून बनवले जातात. सोबतच यामध्ये एक रिंग असते.

फीमेल कंडोम योनीमध्ये कसे बसवले जातात?
दोन बोटांच्या सहाय्याने योनीमध्ये कंडोम सरकवले जाते आणि सेरविक्स पर्यंत टेकवले जाते. यामुळे स्पर्म आणि अंडे यांचे मिलन होत नाही.

कोणत्या महिला याचा वापर करू शकतात?
ज्या महिलांना स्वतःची काळजी घेऊन कोणावर अवलंबून राहायची इच्छा नसते अशा सर्व महिला या कंडोमचा वापर करू शकतात. वापरायलाही सोपे आणि नको असलेल्या गर्भाचा धोका टाळता येतो.

यामध्ये भारतामध्ये कोणती कंपनी हे कंडोम बनवते?
भारतामध्ये कुपीड कंपनी फीमेल कंडोम बनवते. वार्षिक 25000 कंडोमची विक्री भारतामध्ये होत असून, संपूर्ण जगामध्ये या कंपनीने दोन कोटी 30 लाख कंडोम 2019- 20 या एक वर्षात विकले आहेत.

किंमत?
दोन कंडोम असलेल्या एक पॅकची किंमत शंभर रुपये असून, कंडोम्स पुरुषांच्या कंडोमपेक्षा थोडे महाग आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like