लोकांनी पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? पोलीसही हप्ते घेतातच ना ? भास्कर जाधवांचे धक्कादायक वक्तव्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

रत्नागिरी । ‘लोकांनी पोटापाण्यासाठी दारु विकली तर काय बिघडले, पोलीसही हप्ते घेतातच ना!’ असं वादग्रस्त विधान शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. . भास्कर जाधव यांनी आपल्या गुहागर मतदरासंघातील एका राजकीय कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केले. भास्कर जाधव यांच्या या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे

अवैध दारुविक्रीसाठी कारवाई झालेल्या एका शिवसेना पदाधिकाऱ्याची त्यांनी पाठराखण केली. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का ?, असे म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे असे भास्कर जाधव यांनी जाहीरपणे सांगितले. कोकणातील राजकीय वर्तुळाता त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगली आहे.

फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका मुलींची छेडछाड आणि चोरी. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी असल्याचेही त्यांनी म्हटले. त्यामुळे आता विरोधी पक्षांकडून हा मुद्दा उचलून सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. (Shiv Sena leader Bhaskar Jadhav controversial statement about Police)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment