व्हाट्सअँपचे ब्रॉडकास्ट फीचर ; एकाच वेळी तब्बल 256 जणांना मॅसेज पाठवता येणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हाट्सअँप हे अँप जगप्रसिद्ध प्लँटफॉर्म असून , कोट्यवधी लोक याच्याशी जोडलेले आहेत. या प्लॅटफॉर्मचा वापर अनेकजण करत असले तरी , बऱ्याच लोकांना यामधील छुप्या फीचर्सबदल काही कल्पना नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला व्हाट्सअँपमधील असा फीचर्स सांगणार आहोत , ज्यामुळे तुम्ही एकाच वेळी तब्बल 256 जणांना मॅसेज पाठवू शकता. तर चला व्हाटसअँपमधील ब्रॉडकास्ट लिस्ट फिचर बदल माहिती पाहुयात.

ब्रॉडकास्ट फीचर अनेक फायदे –

व्हॉट्सअ‍ॅपवरील ब्रॉडकास्ट फीचरचे अनेक फायदे आहेत . व्हाटसअँपमधील ब्रॉडकास्ट लिस्ट फीचर्सचा वापर करून तुम्ही एकाच वेळी तब्बल 256 जणांना मॅसेज पाठवू शकता. तसेच यासाठी तुम्हाला कोणताही ग्रुप बनवण्याची गरज भासणार नाही . ज्यामुळे सदस्यांना नको असलेले मॅसेज टाळता येतील. या फीचरचा वापर केल्यावर, प्रत्येकाला वैयक्तिक मेसेजसारखा अनुभव मिळतो, कारण तुमचा मॅसेज प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्रपणे पोहोचतो. यामुळे तुमचा वेळही वाचतो, कारण एकाच वेळी अनेक लोकांपर्यंत मॅसेज पोहोचवता येतो. याचे महत्वाचे वैशिष्ट असे आहे कि , ब्रॉडकास्ट मेसेज फक्त त्या व्यक्तींना मिळतो ज्यांनी तुमचा नंबर त्यांच्या फोनबुकमध्ये सेव्ह केला आहे. त्यामुळे तुमचे कॉन्टॅक्ट अपडेटेड ठेवणे आवश्यक आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या सोयीस्कर फीचरचा वापर करून तुम्ही तुमचा वेळ वाचवू शकता आणि अधिक लोकांपर्यंत सहजपणे तुमचा मॅसेज पोहोचवू शकता

ब्रॉडकास्ट लिस्ट कशी तयार करायची –

WhatsApp वर ब्रॉडकास्ट लिस्ट तयार करणे एक सोपी पद्धत आहे, ज्याद्वारे तुम्ही एकाच वेळी अनेक लोकांना मॅसेज पाठवू शकता. यासाठी प्रथम तुमच्या स्मार्टफोनवर WhatsApp अँप ओपन करा. त्यानंतर मेनू (तीन डॉट्स) वर टॅप करा आणि New Broadcast या पर्यायावर क्लिक करा. हि प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या संपर्कांच्या यादीमधून 256 नंबर्स निवडण्याची सुविधा मिळते. एकदा सर्व नंबर निवडल्यानंतर तुम्ही ब्रॉडकास्ट लिस्टला नाव देऊ शकता. लिस्ट तयार झाल्यावर तुम्ही तुमचा मॅसेज टाईप करून तो लिस्टमधील सर्व सदस्यांना एकाच वेळी पाठवू शकता. यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे मॅसेज पाठवण्याची आवश्यकता भासणार नाही आणि सर्वांना एकाच वेळी एकसारखा मॅसेज मिळवता येतो