Wednesday, June 7, 2023

WhatsApp लवकरच आणणार व्हिडिओ काॅलिंगचे ‘हे’ नवीन फिचर; जाणुन घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्म झूम जगभरात लोकप्रिय होत आहे. कोरोनामुळे जगभरातील लोक घरूनच काम करत आहेत. या कारणास्तव,बर्‍याच कंपन्या त्यांचे व्हिडिओ कॉलिंग सॉफ्टवेअर बदलण्यासाठी आणि त्यांची व्याप्ती वाढविण्यासाठी सतत काम करत आहेत.नुकतेच व्हॉट्सअ‍ॅप असेच एक इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जास्तीत जास्त लोकांना व्हिडीओ कॉलमध्ये जोडता येऊ शकेल.व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या केवळ चार लोकच एकाच वेळी व्हिडिओ कॉलिंग करू शकतात.

अँड्रॉइडसाठी जाहीर करण्यात आलेले व्हॉट्सअ‍ॅप बीटावरून असा संकेत मिळाला आहे की, ग्रुप व्हिडिओ कॉलची मर्यादा कंपनी वाढवू शकते. डझनभर लोक एकाच वेळी झूम आणि गूगल डुओसारख्या अन्य व्हिडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ चॅट करू शकतात आणि आता या सोशल डिस्टंसिंगच्या काळात हि एक आवश्यकता बनली आहे. अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप कॉलिंगमध्ये काही बदल केलेले आहेत.

WhatsApp just launched four-person group video calling for all ...

>> व्हॉट्सअ‍ॅपच्या फीचर्सचा मागोवा घेणारी वेबसाइट WABetainfoने दिलेल्या वृत्तानुसार, अँड्रॉइडसाठी जाहीर करण्यात आलेल्या व्हॉट्सअ‍ॅप WhatsApp v2.20.128 बीटामध्ये एक्स्टेंडेड ग्रुप लिमिट देण्यात आली आहे.मात्र,कंपनीकडून ते अजूनही लोकांसाठी एनेबल केलेले नाहीये.

>> सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप कॉलची मर्यादा वाढवून किती केली जाणार आहे हे स्पष्ट झालेले नाही. परंतु लवकरच कंपनी याची घोषणा करू शकते, कारण अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप कॉलिंगमध्ये काही बदल केले होते.

>> व्हॉट्सअ‍ॅपने ग्रुप कॉलिंग इंटरफेसमध्ये काही बदल केले आहेत. ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी एक डेडिकेटेड बटण दिले आहे, जेणेकरून आपण सर्व ग्रुप मेंबर्सना थेट कॉल करू शकता. यासाठी प्रत्येकाची व्हॉट्सअ‍ॅप वर्जन अपडेटेड असला पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

इतर महत्वाच्या बातम्या –

भारतीय लष्करातील ८ जणांना करोनाची लागण- लष्कर प्रमुख मनोज नरवणे

राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०२ वर, दिवसभरात २८६ नवे रुग्ण

सरकारकडून टाळेबंदीत शिथिलता? ‘या’ क्षेत्रांनाही मिळणार सूट, पहा यादी

२० एप्रिलनंतर टाळेबंदीत शिथिलता? पहा काय म्हणतायत राजेश टोपे

सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in