धक्कादायक ! पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलवून केला बलात्कार

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूरमध्ये एका व्यक्तीने आपली पत्नी घरी नसताना शेजारच्या तरुणीला घरात बोलवून तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या आरोपीला बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली आहे. या पीडित तरुणी हि १९ वर्षांची आहे.

हि पीडित तरुणी पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. तर आरोपी अमोल शामराव ठाकरे हा पीडितेच्या शेजारी राहतो. तो भाजीपाला विक्रीचे काम करतो. आरोपी अमोलची पत्नी बाहेरगावी गेली की तो या तरुणीला घरात बोलवून तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित करायचा. हा सगळा प्रकार १ डिसेंबर २०२० ते १२ एप्रिल २०२१ या कालावधीत घडला.

यानंतर त्याच्यात खटके उडायला सुरुवात झाली. यानंतर तरुणीने पारडी पोलीस ठाण्यात अमोल ठाकरे विरुद्ध गुन्हा दाखल केला. या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलीस उपनिरीक्षक शरद शिंपणे यांनी गुन्हा दाखल केला आहे. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तरुणीने बलात्काराची तक्रार नोंदविण्यासाठी एवढा उशीर का केला हे अजून समजू शकले नाही.

You might also like