भारतात कोरोनाची चौथी लाट कधी येणार? तज्ञांनी दिली मोठी माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे भारतात आलेली तिसरी लाट जवळपास संपली आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्येही झपाट्याने घट होत आहे. संसर्गाचा वेग थांबला आहे मात्र आता कोविडच्या चौथ्या लाटेबाबतही चर्चा सुरू झाली आहे. याच दरम्यान, आयआयटी कानपूरच्या शास्त्रज्ञांनी कोविडच्या चौथ्या लाटे बाबत चांगली माहिती दिली आहे. 22 जूनच्या सुमारास देशात कोरोनाची पुढची लाट येईल, जी 24 ऑक्टोबरपर्यंत राहील, असे सांगण्यात येत आहे.

याआधी कोविडशी संबंधित आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी ज्या काही शक्यता व्यक्त केल्या होत्या, त्या जवळपास बरोबर होत्या. यावरून असा अंदाज वर्तवला जात आहे की, कोविडची चौथी लाट तिसर्‍या लाटेक्षा थोडी जास्त काळ टिकू शकते. मात्र, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, चौथ्या लाटेचे संक्रमण कोरोनाच्या व्हेरिएंटवर अवलंबून असेल.

कोरोनाची तिसरी लाट ओसरत आहे. संसर्गाची प्रकरणे दिवसेंदिवस कमी होत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे सुमारे 10 हजार रुग्ण आढळले आहेत, तर आता पॉझिटिव्हीटी रेट केवळ 1 टक्के राहिला आहे. संशोधक आता कोविडची पुढची लाट भारतात किती काळ येऊ शकते यावर संशोधन करत आहेत. MedRxiv मध्ये प्रकाशित झालेल्या रिपोर्ट्स नुसार, कोविडची चौथी लाट 22 जूनपर्यंत भारतात येऊ शकते तर ती 24 ऑक्टोबरपर्यंत राहील.

यापूर्वी, आयआयटी कानपूरनेही कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत शक्यता व्यक्त केली होती की तिसरी लाट फेब्रुवारीच्या सुरुवातीला येईल आणि त्यानंतर प्रकरणांमध्ये घट होईल. शास्त्रज्ञांचे अंदाज अगदी बरोबर निघाले. चौथ्या लाटेबाबत शास्त्रज्ञांनी सांगितले की, ऑगस्टमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेचा उच्चांक येऊ शकतो. 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्टपर्यंत संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होईल.

Leave a Comment