तुमच्या ग्रामपंचायतीचा निधी कुठे खर्च झाला? अशी मिळवा एका क्लिक माहिती

नवी दिल्ली : बऱ्याचदा एखाद्या ग्रामपंचायतीसाठी भरघोस निधी उपलब्ध झालेला असतो पण त्या मनाने विकासकामं केली गेलेली दिसत नाहीत. मात्र तुमच्या गावातला निधी कुठे खर्च झाला त्याची माहिती आता तुम्हाला मिळू शकते. याकरिता ‘ई ग्राम स्वराज’ या नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला मदत करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 एप्रिल 2020 रोजी ‘ई -ग्रामस्वराज’ मोबाईल ॲप्लिकेशनचे लोकार्पण केले. ग्रामपंचायतींच्या विकासाचा निधी कुठे खर्च झाला याची माहिती या ॲप्लिकेशनवर सहज मिळेल. हे आपलिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.

अशी मिळावा माहिती
1)’ई -ग्राम स्वराज’ प्ले स्टोअर वरून डाऊनलोड करून घ्या.
2) हे ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज येईल
3) यानंतरच्या पुढच्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचं राज्य – जिल्हा- तालुका-गाव हे पर्याय निवडायचे आहेत.
4) त्यानंतर सबमीट या बटन वर क्लिक करायचे आहे.
5) त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल.
6) या नव्या पेजवर आपण भरलेली माहिती तुम्हाला वरती दिसेल. गावाच्या नावासमोर गावाचा कोड क्रमांकही दिसेल.
7) त्याखाली ज्या आर्थिक वर्षाची माहिती तुम्हाला पाहायचे आहे, ते वर्ष निवडा.
8) यापुढे तुम्हाला तीन पर्याय दिसतील.
1)elected representative 2)approved activities
3)final progress

9) यापैकी दुसरा पर्याय ए्पृव्हडं ऍक्टिव्हिटीज या पर्यायात ग्रामपंचायतीच्या कोणत्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आल्या आहे असं सांगितले आहे.
10) तिसरा पर्याय फायनान्शिअल प्रोग्रेस यात गावाचा आर्थिक प्रगती विषयी माहिती दिलेली असते. या पर्यायावर क्लिक केल्यास एक नवीन पेज ओपन होते. यात गावाचा कोड आणि नाव दिले असते. त्यानंतर आर्थिक वर्षासाठी तुमच्या गावासाठी किती निधी आला त्याची रक्कम रिसिप्ट या पर्याय समोर दिलेली असते आणि त्यापैकी किती निधी खर्च झाला ही रक्कम एक्‍सपेंडिचर या पर्याय समोर दिलेली असते.

11) त्या खालील पर्यायांमध्ये ग्रामपंचायतीला जो एकूण निधी मिळाला त्याची विभागणी केलेली असते यात कोण कोणत्या योजनेअंतर्गत किती निधी मिळाला आणि त्यापैकी निधी किती खर्च झाला याची सविस्तर माहिती दिलेली असते.

अशाप्रकारे आपण ‘ई -ग्राम स्वराज’ या ॲप द्वारे आपल्या गावासाठी खर्च झालेल्या निधीची माहिती मिळवून घेऊ शकतो.

(टीप : हे आपलिकेशन नुकताच लॉंच करण्यात आले असल्यामुळे यात माहिती भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहेत. त्यामुळे सगळ्याच गावांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींची नावे यात दिसतीलच असं नाही)

You might also like