कोणती बँक कोणत्या व्याज दराने होम लोन देत आहे, त्यासाठीची संपूर्ण लिस्ट येथे तपासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर तुम्हीही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. या काळात, अनेक बँकांव्यतिरिक्त, हाउसिंग फायनान्स कंपन्यांनी आपले होमलोनचे दर कमी केले आहेत. बँक ऑफ बडोदा, स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI), येस बँक (YES Bank), पंजाब नॅशनल बँक (PNB), बँक ऑफ बडोदा (BOB), कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि LIC हाऊसिंग फायनान्स सर्वात स्वस्त होमलोन देतात.

घरांची वाढती मागणी आणि सणासुदीच्या काळात बँकांनी होमलोनचे दर कमी केले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कि कोणत्या बँक कोणत्या व्याजदराने होमलोन देत आहेत…

HDFC Bank :
HDFC ने येणाऱ्या सणांचा हंगाम पाहता होमलोनच्या दरात कपात करण्याची घोषणा केली आहे. ज्याअंतर्गत ग्राहक 6.70 टक्के वार्षिक व्याज दराने होमलोन घेऊ शकतील. हे व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.

LIC Housing Finance :
LIC Housing Finance ने होमलोनचे व्याज दर 50 लाख रुपयांवरून 2 कोटी रुपयांवरून 6.66 टक्के केले आहे. हे लोन फक्त 22 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत घेतलेल्या होमलोनवर लागू होईल.

Yes Bank :
Yes Bank सणासुदीच्या काळात फक्त 6.7% दराने होमलोन देत आहे.

Kotak Mahindra Bank :
Kotak Mahindra Bank ने होमलोनचे व्याजदर 15bps म्हणजेच 0.15 टक्के कमी करून 6.65 टक्क्यांवरून 6.50 टक्के केले आहे. हे नवीन दर 10 सप्टेंबर 2021 पासून लागू होतील आणि 8 नोव्हेंबर 2021 रोजी समाप्त होतील.

SBI :
SBI ने कर्जाची रक्कम कितीही असली तरी फक्त 6.70 टक्के दराने क्रेडिट स्कोअर लिंक्ड होम लोन देण्याची ऑफर दिली आहे. यापूर्वी 75 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड 7.15 टक्के दराने करायची होती. सणासुदीच्या ऑफर सुरू केल्यामुळे, आता कर्जदारांना किमान 6.70 टक्के दराने होम लोन घेता येईल.

Bank of Baroda :
BOB ने आपल्या होम लोन वरील व्याज दर 6.75 टक्क्यांवरून 6.50 टक्के केले आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ग्राहक या नवीन दरांचा लाभ घेऊ शकतात असे बँकेने म्हटले आहे. हे नवीन दर होम लोनसाठी अर्ज करणाऱ्या सर्व ग्राहकांना उपलब्ध असतील.

Canara Bank :
यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील Canara Bank ने MCRL मध्ये 0.15 टक्क्यांपर्यंत कपात करण्याची घोषणा केली होती. बँकेने एक वर्षाचा MCLR दर 0.10 टक्क्यांनी कमी करून 7.25 टक्के केला आहे. कॅनरा बँकेचे नवीन दर 7 ऑक्टोबरपासून लागू झाले आहेत. बँकेने एक दिवसासाठी आणि एक महिन्यासाठी MCLR 0.15 टक्क्यांवरून 6.55 टक्के केले आहे.

Punjab National Bank :
PNB ने 50 लाखांवरील होम लोनवरील व्याज दर 0.50 टक्क्यांनी कमी करून 6.60 टक्के केले आहे. हे व्याजदर 20 सप्टेंबर 2021 पासून लागू झाले. ही विशेष योजना 31 ऑक्टोबर 2021 पर्यंत उपलब्ध असेल.

Leave a Comment