औरंगाबाद : शहरात चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. यामध्ये लॉकडाऊन दरम्यान अनेक दुचाकी चोरीच्या घटना समोर आल्या. यामुळे शहारातील वेगवेगळ्या भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. संशयित दुचाकी चालकाची पोलिसांकडून विचारपूस केली जाते.पैठण गेट चौकात देखील पोलिसांचा बंदोबस्त आहे.
आज दुपारी चार वाजेच्या सुमारास पैठण गेट येथील मुख्य चौकात एका दुचाकी चालकाला पोलिसांना अडवले आणि गाडीच्या कागदपत्रांची विचारपूस केली असता, दुचाकी चालकाने चक्क गाड्यांवर डोके आपटत रस्त्यावर तमाशा सुरू केला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आणि कारवाई करत दंडही आकारला.
चोरीचे प्रमाण वाढल्याने गाड्यांची तपासणी :
लॉकडाऊन दरम्यान शहरातील दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने, ज्या-ज्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त आहे त्याठिकाणी गाड्यांची तपासणी केली जात आहे. तपासणी नंतर पोलिस प्रशासनाच्यावतीने अनेक चोरीच्या गाड्या जप्त केल्या आहेत.
पहा व्हिडिओ
https://www.facebook.com/watch/?v=294325129020273