जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शिगावचे सुपुत्र जवान रोमित चव्हाण यांना आले वीरमरण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

शिगाव गावचे सुपुत्र रोमित तानाजी चव्हाण वय 23 यांना जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना वीरमरण आले. जम्मू-काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवाद्यांच्यावरील कारवाईच्या वेळेस गोळीबार झाला. त्यामध्ये राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.

पाच वर्षा पूर्वी रोमित हा मुंबई येथे सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटर वर त्यांचे एक वर्षे ट्रेंनिग झाले होते. चार महार येथून त्यांच्या देशसेवेला सुरवात झाली होती. एक वर्षा पूर्वी जम्मू काश्मीर येथे 1 राष्ट्रीय रायफल मध्ये पोस्टिंग झाले होते. जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजताच या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते.

यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यानी जवानांवर गोळीबार सुरू केला यामध्ये शिगाव येथील रोमित चव्हाण व उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले. शिगाव गावासह भागात ही बातमी समजताच शोककळा पसरली व सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. पार्थिव रविवारी संध्याकाळी पर्यंत गावात येण्याची शक्यता आहे.

Leave a Comment