जगात सर्वाधिक श्रीमंत कोण? मुकेश अंबानी कि गौतम अदानी? कोणाची संपत्ती किती ते पहा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी पुन्हा एकदा गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. नुकत्याच झालेल्या एका सर्वेनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती अडाणी यांच्याहून अधिक असल्याचं समोर आलं आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्सची नवीनतम आकडेवारी सादर केली गेली आहे. यामध्ये जगातील पहिल्या दहा अब्जाधीशांच्या यादीत मुकेश अंबानी नवव्या क्रमांकावर आहेत, तर गौतम अदानी १० व्या क्रमांकावर आहेत.

आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांचे नवा आले आहे. तसेच जगातील सर्वात श्रीमंतांच्या यादीत एलोन मस्क प्रथम आले आहेत. एलोन मस्कने ५१ अब्ज डॉलर एवढी मालमत्तेत घट करूनही ते अव्वल ठरले आहेत. मस्क यांच्या संपत्तीत मागील वर्षी ४.२२ अब्ज डॉलरची घेत झाल्यानंतर सध्या त्यांची एकूण मालमतट २१९ अब्ज डॉलर्सची डॉलर्स इतकी झाली आहे.

मुकेश अंबानीने कमावले तर गौतम अदानी यांनी गमावले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नेटवर्थमध्ये निव्वळ 9.86 दशलक्ष डॉलर्सची वाढ झाली आहे. मालमत्ता वाढविल्यानंतर मुकेश अंबानीची संपत्ती ९६.१ अब्ज डॉलर्सवर गेली आहे. यावर्षी मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये 6.09 अब्ज डॉलर्सने वाढ झाली आहे. दुसरीकडे, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये काही काळ स्थिर घट झाली आहे. गेल्या बुधवारपासून अदानी ग्रुपचे शेअर्स खाली आले आहेत. यामुळे गौतम अदानी यांच्या मालमत्तांमध्ये $ 2.42 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. म्हणजेच सुमारे 18,780 कोटी रुपये घटले आहेत. गौतम अदानी यांची संपत्ती ९५.७ अब्ज डॉलर्सवर गेली आहे.

Leave a Comment