कोण आहेत सचेत-परंपरा?; सोशल मीडियावर वायरल होणारे हे सिंगर जोडपे ट्रेंडिंग पोलवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अत्याधिक लोकांपर्यंत आपली कला पोहोचवणे अतिशय सोपे झाले आहे. इतकेच नव्हे तर यातून आपल्या अंगी असणाऱ्या कलागुणांना लोकांचा कसा आणि किती प्रतिसाद मिळतोय हे देखील सोशल मीडियावर अगदी सध्या सोप्प्या पद्धतीने समजते. असच कायतरी परंपरा आणि सचेत यांच्या बाबतीतही झालंय.

https://www.instagram.com/p/CPK8O45hnyw/?utm_source=ig_web_copy_link

हे एक अस जोडपं आहे ज्याने सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंगच्या सगळ्या सीमा तोडल्या आहेत. आपल्या सुरेल आवाजाने या दोघांनी तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. यांच्या गाण्यांचे व्हिडीओ इतके वायरल होतात कि बस रे बस. पण हे जोडपं नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर लगेच जाणून घ्या.

https://www.instagram.com/p/CO1nPtpBw_0/?utm_source=ig_web_copy_link

सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर हे छोट्या पडद्यावरील सिंगिंग शो ‘द वॉइस’ च्या पहिल्या पर्वातील स्पर्धक आहेत. मुळात म्हणजे आपल्या आवाजाच्या जोरावर हे दोघेही फायनल ४ मध्ये पोहचले होते. हे दोघेही हा शो जिंकू लागले नाहीत मात्र एकमेकांची मनं यांनी जिंकली होती. काहीकाळ एकमेकांना डेट करून २०२० साली यांनी लग्न केले.

https://www.instagram.com/p/CQF_nPxB5px/?utm_source=ig_web_copy_link

सुपरहिट बॉलिवूड चित्रपट ‘कबीर सिंग’ या चित्रपटातील अत्यंत लोकप्रिय ‘बेखयाली’ हे गाणे यांनीच गायलेले आहे. शिवाय अक्षय कुमारच्या ‘टॉयलेट’ या चित्रपटातीलही काही गाणी यांनी गायली आहेत. इतकेच नव्हे तर त्यांना संगीतसुद्धा दिलं आहे. परंपराने तर आपल्या दमदार आवाजात ‘स्ट्रीट डान्सर’ चित्रपटातील मुकाबला हे गाणे देखील गायले आहे.

https://www.instagram.com/p/CPAY9Rwh_BR/?utm_source=ig_web_copy_link

मात्र या जोडप्याला खरी ओळख त्यांच्या व्हिडीओ रीलमुळे मिळत आहे. हे दोघेही सोशल मीडियावर आपल्या विविध ड्यूएट गाण्यांचे व्हिडीओ शेयर करत आहेत आणि त्यांच्या या व्हिडीओना चाहत्यांकडून भरभरून कौतुक आणि दाद मिळत आहे. या दोघांच्या ‘मीरा के प्रभू’ या व्हिडीओला तर तब्बल ३.५करोडपेक्षा जास्त व्युज आहेत.

https://www.instagram.com/p/CPP4bsnBH1a/?utm_source=ig_web_copy_link

सध्या सोशल मीडियावर फक्त या आणि याच जोडप्याची जोरदार चर्चा आहे. आज प्रत्येक तरुण- तरुणीच्या वॉट्सअप आणि फेसबुक स्टेट्सला या दोघांचेच व्हिडीओ दिसत आहेत. यांच्या दमदार आवाजासोबत त्यांच्या आवाजांची एकसंगता हीच त्यांची खरी ओळख झाली आहे.

Leave a Comment