सुकन्या समृद्धि योजना, PPF, SCSS किंवा KVP यांमधील सर्वोत्कृष्ट कोण आहे, गुंतवणूक करण्यापूर्वी येथे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । बचतीस चालना देण्यासाठी भारत सरकार अनेक लहान बचत योजना चालवित आहेत. सरकार दर तिमाहीमध्ये या बचत योजनांच्या व्याजदरामध्येही बदल करते. या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला 4 ते 7.6 टक्के व्याज मिळते. आज आम्ही तुम्हाला सरकारच्या अशाच काही बचत योजनांविषयी सांगणार आहोत, ज्यात गुंतवणूक करून तुम्हाला गॅरेंटेड उत्पन्न मिळू शकेल. या योजनांमध्ये किसान विकास पत्र (KVP), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS), सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धि योजना यांचा समावेश आहे. जर आपणही यापैकी कोणत्याही योजनेमध्ये गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर कोणत्या योजनेत किती व्याज मिळते हे पहिले जाणून घ्या.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
पीपीएफ ही सर्वात लोकप्रिय कर बचत योजना आहे. यामध्ये केलेली गुंतवणूक 15 वर्षांत मॅच्युर होते आहे. पीपीएफ गुंतवणूकीचा लॉक-इन पिरिअड 5 वर्षांचा असतो. यामध्ये किमान 500 रुपयांपर्यंचीत गुंतवणूक करता येऊ शकते. सध्या त्यामध्ये 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त आहे ते लाइफ टाइममध्ये 15 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करून नियमित उत्पन्न मिळवू शकतात. या योजनेत ज्येष्ठ नागरिक पती-पत्नी एकत्रितपणे 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. 5 वर्षांची लॉक-इन पिरिअड असते, म्हणजेच आपण 5 वर्षांसाधी यामधून पैसे काढू शकत नाही. त्यात सध्या 7.4 टक्के दराने व्याज मिळत आहे.

किसान विकास पत्र (KVP)
किसान विकास पत्रात किमान 1000 रुपये देऊन खाते उघडता येते. त्यात सध्या दरवर्षी 6.9 टक्के दराने व्याज मिळत आहे. किसान विकास पत्रात असे आश्वासन दिले आहे की,आपली गुंतवणूक 10 वर्ष 4 महिन्यांत दुप्पट होईल.

सुकन्या समृद्धि योजना
ही योजना केवळ 10 वर्षांपर्यंतच्या मुलींसाठी आहे आणि जी खूप लोकप्रिय आहे. सध्या त्यात 7.6 टक्के दराने व्याज मिळते आहे. या योजनेत एखादी व्यक्ती आपल्या दोन मुलींसाठी खाते उघडू शकते. वयाच्या 21 व्या वर्षी मुली या खात्यातून पैसे काढू शकतात. या योजनेत ही रक्कम 9 वर्ष 4 महिन्यांत दुप्पट होईल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment