Gold Car : दुबईच्या शेखसाठी सोन्याची गाडी कोण बनवते ??? त्यासाठी किती सोने लागते ??? जाणून घ्या त्याविषयीची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Gold Car : सोने म्हंटल्यावर आपल्याला फक्त दागिन्यांचीच आठवण येते. मात्र आपण कधी विचार केला आहे का की सोनेरी कार कशी असेल. आपण सोशल मीडियावर सोन्याच्या गाड्या अनेक पाहिल्या असतील. मात्र यामधील बहुतेक सोन्याच्या गाड्या या दुबईमधील शेखांच्या मालकीच्या आहेत. आपली श्रीमंती दाखवण्यात कधीही मागे राहत नाहीत. काही शेख तर परदेशात फिरताना या गाड्या आपल्या सोबतच घेऊन जातात. दुबईच्या रस्त्यांवर तर या सोन्याच्या गाड्या अगदी सहजपणे दिसून येतील.

It's a gold car - Strange things Saudi Princes spent money ...

मात्र, हे जाणून घ्या कि, या सोन्याच्या गाड्या कोणताही कार उत्पादक अथवा विशेष ऑर्डर देऊन डिझाइन केल्या जात नाहीत. या गाड्या विकत घेऊन नंतर शेख त्यांना हव्या तशा डिझाइन करून घेतात आणि त्यांना सोन्याच्या गाड्या (Gold Car) बनवतात.

कोण बनवतो या गाड्या ???

दुबईमध्ये सोन्याच्या गाड्या बनवण्यात माहीर असलेले अनेक कारागीर आहेत. अशा गाड्या तयार करणारे बहुतांश शेखांचे खास कर्मचारी आहेत. अत्यंत बारकाईने काम करून अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर या सोन्याच्या गाड्या तयार केल्या जातात.

Cars for the GOLD obsessed: From India & the world

सोन्याची कार कशी बनवतात ???

या सोन्याच्या गाड्या सॉलिड गोल्डच्या नसतात. सोल्युशन तयार करण्यासाठी बहुतेक सोन्यामध्ये केमिकल मिसळले जाते आणि नंतर उच्च तापमानात स्‍प्रे केल्यानंतर कार बेक केली जाते. नंतर या गाड्या मोठ्या काळजीने पॉलिश केल्या जातात. सोप्या भाषेत सांगायचे तर, या गाड्या चकचकीत करण्यासाठी त्यावर सोन्याचा मुलामा दिला जातो आणि नंतर पॉलिश केल्या जातात.

किती सोने वापरले जाते ???

काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशी कार तयार करण्यासाठी साधारणतः 500 ग्रॅम सोने लागते. तसेच, काही लोकांनी 2 किलोपर्यंत देखील सोन्याचा वापर करून अशा कार डिझाइन केल्या आहेत. मात्र, यामध्ये सोन्याचा मुलामा असल्याने त्याचा थर जास्त जाड होऊ शकत नाही. तसेच कवच तयार झाल्यानंतर थर घसरण्याची भीती असते.

4 Gold Cars Shipped To London By Saudi Tourist

गाडी जुनी झाल्यावर काय होते ???

दुबईतील शेखांकडे अमाप संपत्ती आहे हे आपल्यातील सर्वांनाच ठाऊक आहे. ज्यामुळे, त्यांना सोन्याचे गाड्यांचे जास्त कौतुक नाही. वापरून झाल्यानंतर या गाड्या बर्‍याचदा ऑनलाइन आणि दुबईच्या बाजारपेठेमध्ये विकल्या जातात. मात्र बहुतेक लोकं या गाड्यांवरील थर सोल्युशनच्या मदतीने काढून टाकून ती पुन्हा वापरतात. मात्र एकदा ती वापरल्यानंतर त्याची चमक तशीच राहत नाही. तसेच केमिकलचे प्रमाण वाढल्यामुळे यावर डाग दिसू लागतात.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.goldcar.es/en/

हे पण वाचा :
व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्यासाठी Telegram ने लाँच केले खास फीचर्स !!!
‘या’ Valentine’s Day Sale अंतर्गत iPhone 14 वर 30000 रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी !!!
Pension Scheme : ‘या’ योजनेमध्ये गुंतवणूक करून वृद्धांना मिळेल 70 हजार रुपयांची पेन्शन, अशा प्रकारे घ्या फायदा
Motorola Moto E13 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमत असलेला हा जबरदस्त फोन भारतीय बाजारपेठेत दाखल, असे असतील फीचर्स
New Business Idea : दरमहा लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवण्यासाठी सुरू करा ‘हा’ व्यवसाय, सरकारकडूनही मिळेल मदत