बीड | जन्मदात्या बापावर पोटच्या मुलाने बंदुकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळच्या सुमारास बीड जिल्ह्यातील आष्टी शहरातील विनायक नगरमध्ये घडली.या प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मुला विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आले आहे.संतोष किसन लटपटे (वय-५०) असे जखमी वडिलांचे नाव आहे. तर किरण संतोष लटपटे (वय -२४) असे गोळ्या झाडणाऱ्या मुलाचे नाव आहे.
वडील आईला नेहमी त्रास देत असत त्यामुळे किरणच्या मनात वाडीलाविरोधात प्रचंड राग होता. सायंकाळी 6च्या सुमारास पुन्हा वडील आईला त्रास देत असल्याने किरण ने बंदुकीतून वडिलांवर तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटात लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर अहमदनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वडील संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते. यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद व्हायचे. यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले. संतोष लटपटे हे तीन महिन्यापूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता.काल सायंकाळी झालेल्या भांडणात बंदुकीतुनच स्वतःच्या वडिलांना मुलाने तीन गोळ्या झाडल्या.यातील दोन गोळ्या त्यांच्या पोटात लागल्या तर एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.आईला मारहाण झाल्याने राग अनावर होऊन किरण लटपटे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले. तसेच त्याचे वडील संतोष यांनी दारू पिऊन आपल्या आईला मारहाण सुरु केली होती. या प्रकरणी माहिती देताना निरीक्षक सलीम चाऊस म्हणाले “या घटनेने व्यसनाधीनतेमुळे रक्ताची नाती एकमेकांचे जीव घेण्यापर्यंत जात असेल तर हे खरच खूप वाईट आहे. यामुळे लॉकडाऊन मध्ये देखील व्यसनाधीनतेमुळे अनेकांचे कुटुंब उघड्यावर येत आहेत. आता या सुशिक्षित कुटुंबात आईला त्रास देणाऱ्या वडिलावर मुलाने गोळ्या झाडल्या या प्रकरणाचे पोलीस तपासात खरे कारण समोर येईल.