Saturday, March 25, 2023

एकाच लसीचे वेगवेगळे दर का? सोनिया गांधींचा पत्राद्वारे मोदींना सवाल

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : केंद्र सरकारनंही मोठं पाऊल उचलत १ मे पासून देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचा निर्णय घेतला. तसेच लस उत्पादक कंपन्यांना राज्यांना आणि खुल्या बाजारात एकूण उत्पादनाच्या ५० टक्के लसी विकण्याची परवानगी दिली. त्यानंतर सीरमने राज्य सरकारसाठी आणि खासगी रुग्णालयांसाठी आपल्या लसीचे दर जाहीर केले होते. लसींचे दर जाहीर केल्यानंतर या प्रकरणी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. तसेच एकाच लसीचे वेगवेगळे दर का? असा सवाल उपस्थित केलेला आहे.

देशात वाढत असलेल्या कोरोना रुग्ण संख्येला कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. अशा परिस्थितीत  कोरोना लसीकरणाची तिसरी मोहीम 1 मेपासून सुरु करण्यात येणार आहे. तिसऱ्या टप्प्यात कंपन्यांना लस खुल्या बाजार विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (SII) भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशील्ड लशीची नवीन किंमत निश्चित केली आहे. एसआयआयने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली आहे.

- Advertisement -

यावर सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहले मिळणाऱ्या लसीची किंमत हि संपूर्ण देशात समान असावी, जास्त दरात लस दिली तर राज्य सरकारांवरही त्याचा बोजा पडेल. देश संकटात असताना कोणतंही सरकार लोकांना त्रास देत नफेखोरीसाठी मोकळं रान कसं काय देऊ शकतं? म्हणून कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेचा पुनर्विचार केंद्र सरकारनं करायला हवा. संपूर्ण देशात लसीची समान किंमत असावी, अशी मागणी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.