1 जानेवारीपासूनच नवीन वर्ष का सुरू होते? हे आहे त्यामागील कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| थर्टी फर्स्ट जवळ आली की सर्वांचे पार्टीचे प्लॅन ठरवू लागतात. खरे तर आपल्या सर्वांनाच नवीन वर्षाची खूप आतुरता असते. एक जानेवारी म्हटलं की नवीन संकल्प येतात नवीन नाही येतात नवीन विचार येतात आणि नवीन आयुष्य जगण्याचा मार्ग ही येतो. त्यामुळे नवीन वर्ष नेहमीच सर्वांसाठी खास ठरते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का? 1 जानेवारीलाच नवीन वर्ष का सुरू होत? नसेल माहीत तर जाणून घ्या.

ही आहेत त्यामागील कारणे

नवीन वर्ष साजरी करण्याची पद्धत पहिल्यांदा 45 ईसापूर्व सुरू झाली. पूर्वीचे रोमन कॅलेंडर मार्च महिन्यापासून सुरू होत होते. त्यावेळी एका वर्षात 355 दिवस होते. पुढे जाऊन रोमन हुकूमशाह ज्युलियस सीझरने हे कॅलेंडर बदलून टाकले. आणि वर्षाचा पहिला दिवस देखील बदलला. ज्युलियस सीझरनेच 1 जानेवारीला वर्षाचा पहिला दिवस म्हणून घोषित केले होते.

सुरुवातीला अनेक राज्यांनी या निर्णयाला स्वीकारले नव्हते. मात्र ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर लोकांचे विचार बदलत गेले. यात 25 डिसेंबर रोजी येशू ख्रिस्ताचा देखील जन्म झाल्यामुळे सर्वांचे एक जानेवारी हे नवीन वर्ष म्हणून साजरी करण्यास सुरुवात केली. यानंतर पोप ग्रेगरीने ज्युलियन कॅलेंडरमध्ये सुधारणा करत 1 जानेवारीला वर्षातला पहिला दिवस म्हणून जाहीर केले. हीच परंपरा पुढेही चालत आहे.

अनेकांच्या मते 4000 वर्षांपूर्वी प्राचीन बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळात नवीन वर्षात तब्बल अकरा दिवस साजरी केले जायचे. या उत्सवाला अकिटू म्हणले जात असे. यात दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की, संपूर्ण जगभरात सूर्यचक्र किंवा चंद्र चक्राच्या गणनेवर आधारित कॅलेंडर बनवले जाते. ग्रेगोरियन कॅलेंडर सूर्यचक्राच्या क्रियेवर आधारित आहे. बहुतांश देशांमध्ये याच कॅलेंडरचा वापर केला जातो. त्यामुळे 1 जानेवारी दिवस वर्षाचा पहिला दिवस मानला जातो.