मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत? राणेंचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

0
44
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन : परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी करण्यात आली. यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची प्राथमिक चौकशीचे करण्याचे सीबीआयला आदेश दिले आहेत. याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी करताना सदर आदेश दिले आहेत. यानंतर मुख्यमंत्री नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा का देत नाहीत?, असा सवाल करीत खासदार नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला.

खासदार राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेहून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी राणे म्हंणले, मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंग लेटरबॉम्ब प्रकरणी सुनावणी झाली. जयश्री पाटील यांनी यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने याप्रकरणाची चौकशी सीबीआय विभागामार्फत व्हावी, असे निर्देश दिले. यानंतर आता राजकारण तापले आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा.

राणे म्हणाले, माझे-कुटुंब माझी-जबाबदारी, पण ही घोषणा म्हणणारे मुख्यमंत्री जबाबदारी पेलण्यात अपयशी ठरले आहेत. कारण, मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबालाच कोरोना झाला आहे. त्यांच्या पत्नी आणि मुलाला कोरोना झाला होता, अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांचं धोरणच चुकीचं आहे, त्यामुळे राज्यात कोरोना वाढल्याचा आरोपही राणेंनी केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, मुंबईत काय यंत्रणा आहे?. वर्षभरात 18 हजार बेड तुम्ही उपलब्ध करु शकले नाहीत. देशातील इतर राज्यात कोरोनाची संख्या कमी झालीय. मग, महाराष्ट्रातच कशी वाढतेय?, देशात सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रातच आहेत, मग सरकारने काय केलं? असा सवाल राणे यांनी विचारला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here