Wednesday, February 8, 2023

इंधन दरवाढीविरुद्ध आता का बोलत नाही..?; काँग्रेस नेते भाई जगताप यांचा बॉलिवूड दिगज्जांना खडा सवाल

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि, देशामध्ये कोरोना महामारीच्या भयानक संकटाने थैमान घातले आहे. सर्वत्र मृत्यूचे तांडव होत आहे. अश्यावेळी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. यामुळे अनेक उद्योग व्यवसाय बंद आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. अश्या काळात सध्या पेट्रोल आणि डिझेलची मात्र दरवाढ होताना दिसत आहे. खरंतर आपल्याकडे हा अत्यंत संवदेनशील मुद्दा होता. होता म्हणायचे कारण असे, कि पूर्वी चार सहा महिन्यांत पेट्रोलचे दर एखाद रूपयाने वाढायचे. मात्र आजकाल इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. यावर आधी अनेक नेते मंडळी आणि अगदी बॉलिवूड कलाकार देखील बरसून बोलायचे. मात्र आता यांच्यापैकी अनेकांच्या तोंडाला पट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस नेते भाई जगताप यांनी बरोबर मर्मावर बोट ठेवत या कलाकारांना आता कुणीच का बोलत नाही असा सवाल केला आहे.

- Advertisement -

एकीकडे राज्यातील निर्बंधांमुळे सामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पहिल्या लाटेनंतर पुर्वपदावर येत असलेल्या अर्थचक्राला दुसऱ्या लाटेने मोठे स्टॉप लावला असता इंधनाची दरवाढ म्हणजे आगीतून फुफाट्यात असा प्रकार आहे. एकीकडे रोजगार कमी होत असतानाच महागाई दुपटीने वाढत असल्याने जनतेपुढे मोठी आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. देशात इंधनाचे दार आता आकाशाला भिडले आहेत. देशातील अनेक ठिकाणी पेट्रोलचा प्रतिलिटर भाव १०० रुपयांच्या उपर पोहचला आहे. इंधन दरवाढ यावर विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर बरोबर निशाणा साधला असून सत्तेत नसताना इंधनाबाबतची त्यांच्या विधानांची आठवण त्यांनी करून दिली आहे. अशातच काँग्रेस नेते भाई जगताप यांनी, अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि अक्षय कुमार यांना पत्र लिहीत तुम्ही इंधन दरवाढी विरोधात काहीच का बोलत नाही? असा थेट जाब विचारला.

माध्यमांकडून जगताप यांना पत्र लिहण्यामागचे कारण विचारले असता त्यांनी, ‘बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी काँग्रेस सत्तेत असताना पेट्रोल दरवाढी विरोधात व्यक्त झाले होते. मात्र आता ते काहीच बोलत नाहीत म्हणून मी त्यांना पत्र लिहून याबाबत विचारणा करत आहे.’ असे त्यांनी सांगितले आहे. अलीकडेच दरवाढीवरून बॉलिवूड अभिनेत्री व शिवसेना पक्ष कार्यकर्ती उर्मिला मातोंडकरने केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. तिने एका ट्विटच्या माध्यमातून खोचटरित्या केंद्र सरकारला टोमणा मारला होता. या ट्विटचे समर्थन करणारे मोठ्या संख्येत होते. कारण हेच वास्तव आहे कि इंधन दरवाढ हा विषय एका सीमेनंतर अत्यंत त्रासदायक व गंभीर परिस्थिती तयार करू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर सरकारने याकडे लक्ष देणे अपेक्षित आहे.