मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत तर तुम्ही गृहमंत्री असताना कारवाई का नाही केली?? फडणवीस म्हणतात….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. तसेच अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून मलिक कुटुंबियांनी जमीन खरेदी केली असा आरोप फडणवीस यांनी केला. दरम्यान, तुम्हाला हे सगळं माहिती होत तर तुम्ही गृहमंत्री असताना कारवाई का केली नाही असा सवाल फडणवीस यांना केला असता त्यांनी 5 शब्दात उत्तर दिले.

2014 ला तुमचं सरकार होतात, तुम्ही मुख्यंमंत्री आणि गृहमंत्री होतात, मग मलिकांनी अंडरवर्ल्डकडून जमीन घेतली हे माहित असूनही तुम्ही कारवाई केली नाही?, असा धडक सवाल उपस्थित एका पत्रकाराने विचारला. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केवळ 5 शब्दात उत्तर दिलं, ‘त्यावेळी माहिती नव्हती, आता मिळालीय’, अस म्हणत फडणवीस यांनी यावर अधिक बोलणं टाळलं.

फडणवीस यांचेच अंडरवर्ल्डशी संबंध- मलिक

दरम्यान, नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत फडणवीसांनी केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत. उलट देवेंद्र फडणवीस यांचेच अंडरवर्ल्डशी असलेलं संबंध उद्या जाहीर करून मी हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे असा इशारा नवाब मलिक यांनी दिला. फडणवीस मुख्यमंत्री असताना अंडरवर्ल्डला हाताशी धरून राज्याला वेठीस धरले असा आरोपही नवाब मलिक यांनी केला.

Leave a Comment