पतीने नसबंदी केल्यावर देखील पत्नी झाली प्रेग्नेंट; नवऱ्यासह कुटुंबदेखील हैराण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजस्थानमधील अजमेर शहरामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. अजमेरमधील एका युवकाने परिवार सेवा अंतर्गत नसबंदी केली होती. त्यानंतरदेखील 4 महिन्यांनी त्याची पत्नी गर्भवती झाली. आपली पत्नी गर्भवती झाल्यानंतर युवकाने पुन्हा त्याची तपासणी केली, तेव्हा डॉक्टरांनी त्याला नसबंदी यशस्वी झाली असल्याचे सांगितले. यामुळे कुटुंबात तणाव निर्माण झाला.

या घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबियांनी त्या महिलेचा छळ करण्यास सुरुवात केली. या त्रासाला कंटाळून तिने जिल्हा अधिकारी आरती डोगरा यांना घडलेली प्रकार सांगितला. यानंतर आरती डोगरा यांनी सर्व गोष्टी आणि कुटुंबातील तणाव समजून तो दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. यानंतर या महिलेने डीएनए तपासणी करण्यास देखील तयार असल्याचे सांगितले. जेव्हा याचा तपास सुरु झाला तेव्हा यामधून एक वेगळीच माहिती समोर आली.

जिल्हा अधिकारी आरती डोगरा यांनी मुख्य चिकित्सलाय आणि स्वास्थ अधिकारी डॉक्टर के. के. सोनी यांना फोन लावून याबाबत चौकशी केली तेव्हा या प्रकरणामधील सत्य समोर आले. चौकशीत असे समोर आले कि संबंधित व्यक्तीची नसबंदी डॉक्टर भगवान सिंग गहालोत यांनी केली होती. परंतु ती अयशस्वी झाली होती. डॉक्टर सोनी यांनी या प्रकरणाबाबत खुलासा करताना सांगितले कि, शंभर केसेस पैकी एखादी केस अयशस्वी देखील होऊ शकते.

You might also like