Tuesday, October 4, 2022

Buy now

पत्नीच्या आत्महत्येची बातमी समजताच जवानाची देखील स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या

गडचिरोली : हॅलो महाराष्ट्र – गडचिरोलीमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पत्नीने आत्महत्या केल्याचे समजताच एका सीआरपीएफ जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. धानोरा पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे.

चंद्रभूषण जगत असे या आत्महत्या करणाऱ्या जवानाचे नाव आहे. या जवानाने स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा पोलीस ठाण्यात केंद्रीय राखीव दलाच्या जवानांचा कॅम्प आहे. या कॅम्पमध्ये चंद्रभूषण जगत हे जवान कार्यरत आहेत या जवानाचे कुटुंबिय बाहेर गावी मुक्कामाला असते. आज सकाळी या जवानाला त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याची बातमी समजली.

हि बातमी समजताच जवान चंद्रभूषण जगत यांनी त्यांच्याकडे असलेल्या बंदुकीतुन स्वतःच्या अंगावर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले मात्र त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता. चंद्रभूषण हे छत्तीसगड राज्यातील बिलासपूर जिल्ह्यातील रहिवासी असून त्याची पत्नी त्याच्या गावी राहत होती. चंद्रभूषण याचे काही दिवसांपूर्वीच लग्न झाले होते. त्याच्या पत्नीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.