…म्हणून पत्नीने पती झोपेत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून केली हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये एका महिलेने वटपौर्णिमेच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पतीची हत्या केली आहे. ही घटना शिकारपूर गावामध्ये घडली आहे. या आरोपी पत्नीने पती झोपला असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापून त्याची हत्या केली आहे. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार महिला तिच्या पतीच्या बाहेरच्या लफड्यांमुळे खूप वैतागली होती. त्यामुळे तिने हे कृत्य केले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नीला ताब्यात घेतले असून पुढील प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,शिकारपूर गावात वकिल रफीक अहमद आपल्या घरात मृतावस्थेत आढळून आले होते. यानंतर पोलिसांनी परिवारातील लोकांना याची माहिती दिली. यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमार्टमला पाठवले. रफीक अहमद याचा प्रायव्हेट पार्ट कापलेला असल्याचे पोस्टमार्टम दरम्यान समोर आले. यानंतर पोलिसांनी रफीकची पत्नी हाजराची चौकशी सुरु केली. पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान हाजराने आपला गुन्हा कबुल केला. वकिल रफीक अहमदसोबत तिचे लग्न झाले होते. पण रफीकने दुसरेही लग्न केले होते. मात्र, काही कारणामुळे रफीकची दुसरी पत्नी रफीकला सोडून गेली होती. त्यामुळे त्याला तिसरे लग्न करायचे होते.

हाजराने पुढे सांगितले कि,तिने पतीच्या तिसऱ्या लग्नाला विरोध केला होता. यावर रागावलेल्या रफीकने हाजराला मारहाणसुद्धा केली होती. याच गोष्टीला वैतागून हाजराने आपला पती झोपेत असताना त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आणि त्याची हत्या केली. पतीच्या अय्याशीला कंटाळून त्याची पहिली पत्नी हाजराने रफीक अहमद याचे गुप्तांग कापून त्याची हत्या केली. या प्रकरणी पत्नीला अटक करण्यात आली असून पुढील कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती पोलीस अधिकारी जितेंद्र तेवतिया यांनी दिली आहे.