तिचा दुसऱ्यात जीव गुंतला त्यानंतर नवऱ्याने केले असे काही…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – अनेकदा आपण चित्रपटात किंवा पुस्तकात बघतो कि आपल्या पत्नीचे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम असते तेव्हा तिचा नवरा आपल्या जीवाची बाजी लावून त्यांचे एकमेकांबरोबर लग्न लावून देतो. पण प्रत्यक्षात असे घडू शकते यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र अशा प्रकारची घटना बिहारमधील भागलपूर भागात घडली आहे.

काय आहे प्रकरण
उत्तम मंडल या व्यक्तीचे ७ वर्षांपूर्वी सपना कुमारी नावाच्या महिलेशी लग्न झाले होते. सपना ही खगडिया येथील तर उत्तम हा भालपूर जिल्ह्यातील सुलतानगंज येथे राहणारा आहे. लग्नानंतर हे दोघेही खूप आनंदात होते. त्यानंतर अचानक एक दिवस त्यांच्या नात्यात दुरावा आला. त्याला कारण म्हणजे उत्तमच्या घरी आलेल्या एका नातेवाईकाला पाहताच सपना त्याच्या प्रेमात पडली. व त्या व्यक्तीला देखील सपना आवडायला लागली. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत हे जेव्हा उत्तमला समजले तेव्हा त्याने सपनाला समजावण्याचा प्रयत्न केला पण सपनाने त्याचे काहीच ऐकून घेतले नाही.

उत्तमला सपनाच्या प्रेमसंबंधाबाबत कळाल्यानंतरसुद्धा ते एकत्र राहत होते. उत्तम आणि सपनाला २ मुलेदेखील आहेत. मुले झाल्यानंतर सपनाचे मन बदलेल असे उत्तमला वाटत होते पण सपनाच्या मनातील प्रियकराविषयीचे प्रेम कमी होण्याऐवजी वाढत चालले होते. सपनाच्या सासरच्या लोकांनीसुद्धा तिला समजावून सांगितले पण तिने त्यांचेदेखील ऐकले नाही. यामुळे उत्तमने अखेर तिचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. उत्तमने सपनाचे लग्न तिचा प्रियकर राजू कुमार याच्याशी लावून दिले. सपना आणि राजुने सुलतानगंज इथल्या एका मंदिरात उत्तम याच्या उपस्तिथीत लग्न केले. लग्नानंतर सपना आणि राजूने उत्तमचे आशिर्वाददेखील घेतले.

You might also like