Monday, January 30, 2023

ती चक्क नवऱ्याच्या जवळच्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडली आणि आता तिघेही एकाच घरात एकत्र राहतात

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपण सहसा पती, पत्नी आणि ‘वो’ च्या अनेक कथा ऐकल्या असतील. पण, अमेरिकेत अशी घटना चर्चेत आली आहे, जी ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले. इकडे एक बाई चक्क आपल्या नवऱ्याच्या जवळच्या मैत्रिणीच्याच प्रेमात पडली. सत्य जाणून घेतल्यावर नवऱ्याने जे केले ते फारच धक्कादायक आहे.

अमेरिकेच्या सिएटलमध्ये एका व्यक्तीला जेव्हा आपली बायको बायसेक्सुअल असल्याचे समजले तेव्हा त्याने पत्नीला गिफ्ट म्हणून तिचे प्रेम दिले. आपली पत्नी प्रेम करत असलेल्या मुलीला नवऱ्याने घरी आणले. ही मुलगी खरंच त्या व्यक्तीची अगदी जवळची मैत्रिण आहे. आता हे तिघेही जण एकाच घरात आनंदाने आयुष्य जगत आहेत.

- Advertisement -

कॅटी आणि जस्टिनची प्रेमकथा 2006 मध्ये एका कॉमेडी शोमध्ये सुरू झाली होती. जस्टीन व्यवसायाने कॉमेडियन आहे, तर कॅटी रुप्पल रिअल इस्टेट असोसिएट आहे. कित्येक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर कॅटी आणि जस्टीनचे 2013 मध्ये लग्न झाले.

एके दिवशी कॅटीने तिच्या नवऱ्याला तिच्या बायसेक्सुअलिटीबद्दल सांगितले. जस्टीनची मैत्रीण क्लेअर त्याला आवडत असल्याचेही तिने उघड केले. तिने क्लेअरला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर पाहिले आणि ती तिच्याकडे आकर्षित झाली. जस्टीनने सांगितले की, क्लेअर थॉर्नहिल, 36, त्याची कॉलेज मैत्रीण आहे. जेव्हा त्याला कळले की, कॅटी क्लेअरवर प्रेम करते, तेव्हा एके दिवशी त्याने आपल्या पत्नीसमवेत क्लेअरला याबद्दल सांगितले.

हे ऐकून क्लेअर सरप्राइज झाली, पण तिला मुला-मुली या दोघांमध्येही रस आहे. म्हणून तिने कॅटी आणि जस्टीनसोबत राहण्यास सहमती दर्शविली.

त्याच्या या निर्णयामुळे कुटुंबातील सदस्यांना कोणतीही अडचण उद्भवली नाही, परंतु बऱ्याच वेळा ऑनलाइन ट्रोल व्हावे लागले. क्लेअर याबद्दल सांगते की ‘आपण एखाद्यावरचे आपले प्रेम कमी न करता अनेक लोकांवर प्रेम करू शकतो आणि आपण एकमेकांना भाग्यवान आहोत.’

ती पुढे म्हणाली, “आम्हाला आमच्या पार्टनरशिपचा अभिमान आहे आणि एखाद्यावर प्रेम करायला लाज वाटण्याची गरज नाही हे लोकांनी कळून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.”

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group