व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

दुसऱ्या महिलेसोबतचे चॅटिंग पत्नीला सापडले अन् मग…

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
मोबाईलवर पती दुसऱ्या महिलेसोबत चॅटिंग केल्याचे पत्नीला सापडले अन् संतप्त झालेल्या पत्नीने याचा जाब विचारला. पत्नीने जाब विचारल्याने पतीने तिला मारहाण केली. सदरची घटना साताऱ्यात घडली. याप्रकरणी पीडित विवाहितेने सातारा शहर पोलिस ठाण्यात पती, सासूविरोधात तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहरात वास्तव्यास असणारी पीडित विवाहिता ही 25 वर्षांची आहे. तिच्या पतीने दुसऱ्या एका महिलेसोबत मोबाइलवर चॅटिंग केल्याचे पत्नीला सापडले. यामुळे संतप्त झालेल्या पत्नीने याचा पतीला जाब विचारला असता उलट पतीने तिलाच मारहाण केली. एवढेच नव्हे तर शिळे जेवण खायला घालून जुने कपडे घालायला लावून मानसिक व शारीरिक छळ केला.

पतीच्या या मारहाणीमुळे, दिलेल्या त्रासामुळे पीडित महिलेने सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेतली. पती आणि सासूविरोधात गुन्हा दाखल केला. याबाबत हवालदार इंगवले हे अधिक तपास करीत आहेत.