अगं बाई!! चक्क नवर्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र

‘एका लग्नाची अनोखी गोष्ट’; तरुणाईत लग्नाचा नवा ट्रेंड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | लग्न म्हणजे एक पवित्र बंधन. लग्नात साता जन्माची गाठ बांधली जाते आणि पती पत्नीचं हे नातं नव्या आयुष्याला सुरुवात करतं. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यात बदल घेऊन येतं. असं म्हणतात की लग्नानंतर पती आणि पत्नी दोघांचंही नवं आयुष्य सुरू होतं. लग्न झालं की पत्नी नव्या रुपातही दिसते. गळ्या मंगळसुत्र पायात जोडवे कपाळावर टिकली आणि मांगेत कुंकू… मात्र तुम्ही असं लग्न कधी पाहिलंत का ज्यात नवरा मुलगा मंगळसुत्र घालतो. हो… सध्या अशाच एका लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होताना दिसतेय.

नेहमी मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून मुलगा तिला सौभाग्याचं लेणं बहाल करतो. मात्र, आता एका लग्नात चक्क नवरीनं नवरदेवाच्या गळ्यात मंगळसुत्र टाकलं. शार्दुल कदम या तरुणाने एक वेगळा निर्णय घेतला आहे. समाजात खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता आणण्यासाठी फक्त स्त्रीयांनीच का मंगळसूत्र घालावं असं म्हणत त्यानं लग्नबंधनात अडकत असताना स्वत: मंगळसूत्र घालण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दूलच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागत केलंय तर अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे.

शार्दुलने लग्नाचे फोटो शेअर करत एक पोस्ट लिहली आहे. ज्यात त्याने मंगळसूत्र घालण्याच्या निर्णयाचा खुलासा केला आहे. “मंगल शब्दाचा अर्थ शुभ आणि सूत्र म्हणजे धागा – मंगळसूत्र म्हणजे मंगळसूत्र म्हणजे आत्मा एक होणारा शुभ धागा. मंगळसूत्राकडे मात्र समाजाकडून वेगळ्या नजरेने पाहिलं जातं. फक्त स्त्रीनेच मंगळसूत्र घालावं हा समाजाचा नियम आहे.पण मला हे खटकतं. मला वाटतं मी माझ्या पत्नीवरचं प्रेम दर्शवण्यासाठी मंगळसूत्र घालू शकत नाही का ? आमच्या नात्याचं प्रतिक म्हणून मी हा धागा का घालू नये”असं शार्दूल म्हणाला आहे.शार्दूलने पत्नीच्या गळ्यात काळ्या मण्यांचं दोन डोरली असलेलं मंगळसूत्र घातलं. तर याचं वेळी तिने देखील शार्दूलच्या गळ्यात काळ्या मण्यांच्या माळेत एक गोल चांदीच पेंडन्ट असलेलं मंगळसूत्र घातलं.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like