Monday, January 30, 2023

अफगाण मुलींना शाळेत परतण्याची परवानगी मिळणार? तालिबानकडून निवेदन जारी

- Advertisement -

काबूल । तालिबानने मंगळवारी जाहीर केले की,”मुलींना शक्य तितक्या लवकर शाळेत परतण्याची परवानगी दिली जाईल. “आम्ही या गोष्टींना अंतिम रूप देत आहोत … ते शक्य तितक्या लवकर केले जाईल,” पझवोक अफगाण न्यूजने उपशिक्षण मंत्री जबीउल्ला मुजाहिद यांच्या हवाल्याने सांगितले. आठवड्याच्या सुरुवातीला, शिक्षण मंत्रालयाने पुरुष शिक्षक आणि विद्यार्थ्यांना माध्यमिक शाळेत परत जाण्याचे निर्देश दिले होते. सर्व पुरुष शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी शनिवारपासून त्यांच्या शैक्षणिक संस्थांमध्ये उपस्थित रहावे,” असे या निवेदनात म्हटले गेले आहे.

मात्र, त्या वेळी मंत्रालयाने महिला शिक्षकांबद्दल आणि विद्यार्थिनींविषयी काहीही म्हंटले नाही, ज्यामुळे मुलींच्या शिक्षणाबद्दल चिंता निर्माण झाली. तालिबानच्या या हालचालीमुळे, संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) आणि संयुक्त राष्ट्र बाल निधी (UNICEF) यांनी निवेदने जारी केली की,” अफगाण मुलींच्या शाळा बंद करणे हे शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन आहे.”

- Advertisement -

हे निवेदन अशा वेळी आले आहे जेव्हा शनिवारी मुलांच्या माध्यमिक शाळा पुन्हा सुरू झाल्या, मात्र मुलींच्या शाळांचे भविष्य अस्पष्ट आहे. युनेस्कोच्या मते, अफगाणिस्तानने गेल्या दोन दशकांत शिक्षण क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. UNESCO च्या म्हणण्यानुसार, “2001 पासून, महिला साक्षरता दर सुमारे 17 टक्क्यांपेक्षा दुप्पट झाली आहे आणि 30 टक्क्यांपेक्षा जास्त झाली आहे आणि प्राथमिक शाळांमधील मुलींची संख्या 2001 मध्ये जवळजवळ शून्याहून 2018 मध्ये 2.5 मिलियन झाली आहे.”

अफगाणिस्तानातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुलींची संख्या देखील गेल्या 20 वर्षांमध्ये लक्षणीय वाढली आहे. येथील उच्च शिक्षण संस्थांमध्ये मुलींची संख्या 2001 मध्ये 5,000 पेक्षा 2018 मध्ये वाढून 90,000 झाली आहे.