सक्तीची वसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांविरोधात आंदोलन करणार ; साजिद मुल्ला यांचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : सकलेन मुलाणी
कोरोना महामारीच्या काळातही खाजगी फायनान्स कंपन्यांकडून सर्वसामान्य जनतेला वसुलीच्या नावाखाली दमदाटी केली जात आहे. याविरोधात बळीराजा संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी प्रशासनास आंदोलनाचा इशारा सोमवारी दिला आहे. प्रशासनाने खाजगी फायनान्स कंपन्यांकडून केली जात असलेली कर्जवसुली तात्काळ थांबवावी आणि वसूलीसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही मुल्ला यांनी केली आहे.

सजीत मुल्ला यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे गेली दोन ते तीन महिने झाले प्रशासनाच्या वतीने सातारा जिल्ह्यात लाकडाऊन करण्यात आले सर्वसामान्य जनतेने प्रशासनाला सहकार्य केले अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद पडले मात्र खाजगी फायनान्स ब्यांका यांचे व्याज मात्र चालूच राहिले अक्षरशा सर्वसामान्य जनतेला हातात काम नसल्यामुळे तीन ते चार महिने घरातच बसून काढावे लागले सातारा जिल्ह्यात अंशतः लाकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली. परंतु अद्यापही दैनंदिन व्यवहार सुरळीत झाले नाहीत. अशा कोरोनाच्या संकटातही खाजगी फायनान्सवाले सर्वसामान्य जनतेला वसूलीच्या नावाखाली दमदाटी, शिवीगाळ करीत आहेत.

ज्याप्रमाणे लॉकडाऊनबाबत प्रशासन सातारा जिल्ह्यातील जनतेला नियम पाळण्यासाठी आदेश काढत असते त्याच प्रमाणे खाजगी फायनान्स कंपनी, बॅंका यांच्याकडून केल्या जात असलेल्या वसुलीसाठी सहा महिने मुदतवाढ देण्यासाठीचा आदेश काढावा, दमदाटी करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या संबंधित प्रतिनिधींवर कारवाई करावी. जर खाजगी फायनान्स कंपनीच्या गुंडांकडून वसुली च्या नावाखाली दमदाटीचे प्रकार चालूच राहिले तर बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने सातारा जिल्ह्यात सर्वसामान्य शेतकऱ्यांना बरोबर घेऊन सातारा जिल्ह्यात सक्तीच्या कर्जवसुली विरोधात मोठं जन आंदोलन उभे करु. आणि होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी दिला दिला आहे.

Leave a Comment