‘त्या’ दिवशी पुन्हा लॉकडाउन लावणार; राजेश टोपेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या काही प्रमाणात आटोक्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर अनेक निर्बंधात शिथिलता आणली आहे. परंतु राज्यात तिसऱ्या लाटेची भीती कायम असून तिसऱ्या लाटेत जर राज्याला ठराविक मर्यादेपेक्षा ऑक्सीजन अधिक लागला, तर पुन्हा कडक लॉकडाऊन लागू केला जाईल, अशा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिला

राजेश टोपे म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जी कोरोनाबाधितांची सर्वोच्च आकडेवारी होती तेवढी ऑक्सिजनची व्यवस्था करण्याची सूचना टास्क फोर्सकडून देण्यात आली आहे. त्यानुसार जवळपास 3800 मेट्रिक टनपर्यंत ऑक्सिजनजी गरज भासणार आहे. अशा परिस्थिती 700 मेट्रिक टन ऑक्सिजन तिसऱ्या लाटेत ज्यादिवशी लागेल तेव्हा राज्यात तातडीने लॉकडाऊन करण्यात येईल, असे राजेश टोपे यांनी म्हंटल.

दरम्यान, राज्यात हॉटेल चालकांना दिलासा मिळाला आला तरी सिनेमागृह आणि नाट्यगृह आणि धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंदच असणार आहे. शॉपिंग मॉल 10 वाजेपर्यंत सुरु राहतील मात्र त्या ठिकाणी जाणारे आहेत त्यांचे दोन डोस झालेले असावेत असं राजेश टोपेंनी सांगितलं.

Leave a Comment