औरंगाबाद | पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या येत्या दोन दिवसात बदल्याचा पोळा फुटणार आहे़ पोलीस आयुक्त डॉ़ निखिल गुप्ता यांनी कर्मचाऱ्यांच्या पसंती ठिकाण जाणूण घेण्यासाठी जाणूण घेण्यासाठी शुक्रवारी दरबार भरविला होता. सदर बदली प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात साडेपाचशे कर्मचाच्यांची बदली होणार आहे.
शहर पोलीस दलात पाच वर्ष एकाच ठिकाणी पुर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या अग्रक्रमाने होतील. यासाठी शहर पोलीस दलातील जवळपास आठशे कर्मचारी पात्र ठरणार असल्याची माहिती मिळत आहे. पोलीस आयुक्तालयात शुक्रवारपासून बदल्यांचा हंगाम सुुरु झाला आहे. पोलीस ठाण्यामध्ये टर्म पुर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची यादी मागवण्यात आली असून या शिवय 451 कर्मचायांनी बदलीसाठी विनंती केली आहे.
बदलीच्या मौसमात वसीलेबाजी करून कर्मचारी गुन्हे शाखा आणि वाहतुक शाखेला प्राधान्य देत होते. मात्र यंदा गुन्हे शाखेत सुरु असलेल्या आलबेल मुळे कर्मचाऱ्यांनी ठिकाणासाठी अधिकची पसंती दिलेली नाही. अनेकांनी एमआयडीसी वाळुजला प्रथम पसंती दिली. दुसऱ्या क्रमांकावर गुन्हे शाखा, तिसऱ्या क्रमांकावर वाहतुक शाखा, त्यानंतर बिडीडीएस, एसबी शाखेचा समावेश आहे. प्राप्त साडे चारशे कर्मचाºयांपैकी 70 कर्मचाऱ्यांनी आई वडिलांची सेवा करण्यासाठी, तर 80 कर्मचाऱ्यांनी मुलांच्या शिक्षणाचे कारण पुढे केले आहे तर काहींनी घर लांब असल्याचे सांगत बदली मागितली आहे. शुक्रवारी आयुक्तालयात कर्मचाऱ्यांचा दरबार भरवण्यात आला असून यात कर्मचाऱ्यांना तात्काळ बदलीची आर्डर देण्यात येणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.