मोदींच्या कृपेने पेट्रोल 150 रुपये होईल, जयंत पाटील यांची महागाईवरून टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या कृपेमुळे पेट्रोल 118 रुपयाने झाले आहे. पुढच्या वेळी 125 त्यानंतर 150 सुद्धा होईल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला. महागाईची झळ सर्व सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात बसत आहे. याचा विचार गांभीर्याने केला पाहिजे, असेही ते म्हणाले.

सांगलीमध्ये आर. आर. पाटील सुंदर गांव पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मतदाराच्या मागे चौकशीचे शुक्लकाष्ट लागेल असे वक्तव्य केले होते. यावर पाटील म्हणाले,” क्रिकेटमध्ये वाडेकर इंग्लंडला जाऊन आले. त्यावेळी भारताचा दारुण पराभव झाला. त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हाला 11 खेळाडूंच्या नाहीतर 13 खेळाडूंच्या विरोधात खेळायला लागले. कारण दोन पंच देखील आमच्या विरोधात होते, असे वाडेकर म्हणाले होते. त्याच पद्धतीने इडी आणि सीबीआय आमच्या विरोधात आहेत. त्यामुळे तसाच प्रकार देशात चालू आहे, “असा टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.

शेजारच्या देशात महागाईची जी परिस्थिती झाली आहे. त्याठिकाणी नियोजनबद्ध असे काही नाही. मात्र, मनमोहन सिंग यांनी 1991 पासून आर्थिक व्यवस्था निर्माण केली. त्यामुळे कोणताही परिणाम भारताला सोसावा लागला नाही. आज तीच व्यवस्था चालू असेल तर भारताला ही त्याची झळ बसणार नाही, अशी खात्री आहे, असेही पाटील म्हणाले.

Leave a Comment