Wednesday, February 1, 2023

‘तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल’ असे म्हणत महिलेचा माजी आमदाराच्या सुनेवर हल्ला

- Advertisement -

लखनऊ : वृत्तसंस्था – एका माजी आमदाराच्या सुनेवर तिच्या घरात घुसून एका महिलेने जीवघेणा हल्ला केला आहे. हि घटना लखनऊमध्ये घडली आहे. फर्रुखाबाद मतदार संघातून माजी आमदार असलेले विजय सिंह समाजवादी पार्टीचे माजी आमदार आहेत, यावेळी ते ब्रह्मदत्त द्विवेदी हत्याकांडात कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या माजी आमदाराच्या सुनेने आरोप केला आहे की, घरात घुसलेली महिला तिच्या पतीची मैत्रिण आहे. त्या महिलेने एकताला म्हटले, तुझा पती माझा आहे, तुला मरावे लागेल…यानंतर तिने एकतावर हल्ला करत तिचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. एकताच्या बहिणीने तिचा जीव वाचवला.

आरोपी महिला 29 मे रोजी सकाळी माजी आमदाराच्या सुनेच्या हजरतगंजच्या कसमंडा हाऊस अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये घुसली आणि तिने माजी आमदाराच्या सुनेवर जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी एकताने वीरांगना सिंहच्या विरूद्ध हजरतगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा हजरतगंज पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकार
29 मे रोजी सकाळी वीरांगना आमच्या फ्लॅटमध्ये घुसली. त्यावेळी घरात एकता आणि तिची बहिण हे दोघेच होते. एकताचा पती अविनाश घराबाहेर गेला होता. वीरांगनाने रॉडने हल्ला केल्याचा आरोप एकताने केला आहे. तसेच वीरांगनाने एकताला गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. एकताच्या बहिणीने मध्ये पडून एकताचा जीव वाचवला आहे.