धक्कादायक ! आईने आपल्या 5 मुलींसह धावत्या एक्सप्रेससमोर उडी मारून केली आत्महत्या

छत्तीसगड : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या महासमुंद या ठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या ५ मुलींसह बुधवारी रात्री ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली आहे. या सगळ्यांचे मृतदेह गुरुवारी सकाळी रेल्वे ट्रॅकच्या ५० मीटर अंतरावर विखुरलेल्या अवस्थेत सापडले. मृत मुलांचे वय हे १० ते १८ या वयोगटातील आहे. दारूड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून या महिलेने आत्महत्यासारखे पाऊल उचलले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

काय आहे प्रकरण
गुरुवारी सकाळी लोकांना इमलीभांठा नदीजवळ रेल्वे ट्रॅकवर काही मृतदेह आढळून आले. यानंतर त्या लोकांनी याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनला दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचताच पोलिसांनी रेल्वेलाही याची माहिती दिली त्यानंतर काही वेळ याठिकाणची रेल्वे वाहतूक थांबवण्यात आली होती. मृत उमा साहू आणि तिचा नवरा केजराम यांच्यात अनेकदा भांडण होत होते. तसेच केजराम याला दारूचे व्यसन होते. बुधवारी संध्याकाळी केजराम दारू पिऊन घरी आला तेव्हा पत्नी उमा आणि त्याच्यात जोरदार भांडण झाले. हा वाद एवढा वाढला कि उमाने संध्याकाळी ७.३० च्या सुमारास पाच मुली अन्नपूर्णा, यशोदा, भूमिका, कुमकुम आणि तुलसीला घेऊन घराबाहेर पडल्या. यानंतर या सर्वांचा ठावठिकाणा लागला नव्हता. त्यानंतर त्यांनी ९.३० च्या सुमारास लिंक एक्सप्रेससमोर या सर्वांनी उडी मारून आत्महत्या केली आहे.

छिन्नविछिन्न अवस्थेत दूरपर्यंत पसरले मृतदेह
बुधवारी रात्री उशीरा ही घटना घडली. महिला आणि ३ मुलींचा मृतदेह काही अंतरावर सापडले तर अन्य दोन मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडले होते. तसेच मृतदेहासोबत त्यांच्या चप्पलादेखील पडल्या होत्या. आसपासच्या लोकांची चौकशी करून मृतदेहाची ओळख पटवली अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

You might also like