बुलडाण्यात ग्रामसेवक महिलेची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा : हॅलो महाराष्ट्र – बुलडाणा शहरातील सुंदरखेड परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये एका 35 वर्षीय ग्रामसेवक महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे यावेळी मृत महिलेचा मुलगा देखील घरातच होता. पण आईच्या मनात काय चाललंय याची जराही कल्पना त्याला नव्हती. गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आईला पाहून त्या मुलाला जबर धक्का बसला आहे. यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

अपेक्षा प्रवीण कंकाळ असे मृत पावलेल्या 35 वर्षीय ग्रामसेवक महिलेचे नाव आहे. हि मृत महिला बुलडाणा शहराच्या सुंदरखेड परिसरातील तार कॉलनीत आपले पती आणि दोन मुलांसोबत राहत होती. मृत अपेक्षा यांचे पती प्रवीण कंकाळ हे लघुसिंचन विभागात नोकरीला आहेत. घटनेच्या दिवशी प्रवीण हे नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेले होते. यावेळी मृत अपेक्षा कंकाळ आणि त्यांचा मोठा मुलगा हे दोघेच घरी होते.

यादरम्यान “माझं डोकं दुखत आहं” असे सांगून अपेक्षा या घरातील मागील खोलीत निघून गेल्या. काही वेळानं मुलगा आईच्या खोलीत गेला. यावेळी अपेक्षा हि घरातील पंख्याला ओढणीनं गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. आपल्या आईला या अवस्थेमध्ये पाहून त्याला धक्काच बसला. त्याने लगेच आपल्या वडिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पती प्रवीण कंकाळ तातडीनं घरी आले. यानंतर प्रवीण कंकाळ यांनी तातडीने अपेक्षाला बुलडाणा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्यागोदरच तिचा मृत्यू झाला होता. 35 वर्षीय ग्रामसेवक महिलेने आत्महत्या केल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Leave a Comment