व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

आता काय म्हणायचे याला ! मांत्रिकाने स्वप्नात केला बलात्कार, महिलेने दाखल केला गुन्हा

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – श्रद्धाळू महिला किंवा अल्पवयीन तरुणींना आपल्या जाळयात ओढून मांत्रिकाने त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या अनेक घटना याअगोदर देखील घडल्या आहेत. या आरोपी मांत्रिकांवर पोलिसांनी कारवाईदेखील केली आहे. पण औरंगाबादमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. यामध्ये एका मांत्रिकाने स्वप्नात येऊन आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे. याबाबत तिने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या महिलेने केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तथाकथित आरोपी मांत्रिकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली आहे. पण त्याच्या विरोधात कोणताही पुरावा नसल्याने या मांत्रिकाला सोडून देण्यात आले. हि घटना बिहारच्या औरंगाबाद या ठिकाणी घडली आहे. फिर्यादी महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले,काही दिवसांपूर्वी फिर्यादीच्या मुलाची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यामुळे फिर्यादीने प्रशांत चतुर्वेदी नावाच्या एका मांत्रिकाकडून मुलावर उपचार करून घेतले होते. तसेच आपला मुलगा बरा व्हावा म्हणून घरात पूजा देखील केली होती.

पण पूजा केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांतच फिर्यादीच्या मुलाचा मृत्यू झाला होता. यामुळे आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला? याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी महिला मांत्रिकाच्या घरी असता मांत्रिकाने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आपल्या मुलाने तिला मांत्रिकापासून वाचवले असा दावाही या महिलेने आपल्या तक्रारीत म्हंटले आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.