महिलेने 14 वर्षाच्या मुलाशी ठेवले लैगिक संबंध, गर्भवती झाल्यामुळे तुरुंगात केली रवानगी

न्यूयॉर्क । अमेरिकेतून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. इथे एका 23 वर्षीय महिलेला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली दोषी ठरवले गेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटनी ग्रे नावाच्या या महिलेचे एका 14 वर्षाच्या मुलाशी लैंगिक संबंध होते. महिलेबाबत तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. या तपासानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचले जिथे या महिलेचे संपूर्ण रहस्य समोर आले.

हे प्रकरण मागच्या वर्षातील आहे. अमेरिकेच्या आर्कान्सामध्ये पोलिसांना बाल शोषणाच्या हॉटलाईनवरून अशी माहिती मिळाली की, एका 23 वर्षीय महिलेचा 14 वर्षाच्या मुलाशी संबंध आहे. पोलिसांना याबाबतची माहिती पहिल्यांदा 28 फेब्रुवारी रोजी दिली गेली. यानंतर 29 सप्टेंबर रोजी या महिलेच्या संदर्भात आणखी एक माहिती मिळाली. असे म्हटले जात होते की, ब्रिटनी गेल्या एका वर्षापासून या मुलाचे शोषण करीत आहे. यानंतर पोलिसांनी आणखी एका महिलेच्या मदतीने संबंधित महिलेला शोषण करताना पकडले.

व्हिडिओ फुटेजमध्ये सदर महिला दिसून आली
डिटेक्टिव्ह रोंडा थॉमस यांनी कोर्टाला सांगितले की, त्यांच्याकडेही या महिलेचा मेडिकल रिपोर्टही आहे. त्या म्हणाल्या की,”सदर महिला गर्भवती आहे.” कोर्टाच्या कागदपत्रात असे लिहिले आहे की,” ज्या रुग्णालयात ही महिला तपासणीसाठी गेली होती तेथील व्हिडिओ फुटेजही आहेत आणि या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसत आहे की ती महिला आणि 14 वर्षाचा मुलगा दोघेही रुग्णालयात दाखल होत आहेत. 1 मार्च रोजी आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली. तिला कोणती शिक्षा दिली जाईल हे सध्या ठरलेले नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

You might also like