महिला पोलिसांना आता आठ तासांचीच ड्युटी; पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहर पोलीस दलातील महिला कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्तांनी मोठा दिलासा दिला आहे. 12 तास ड्युटीतील चार तास कपात करुन आता आठ तासांची ड्युटी देण्याचा निर्णय पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी घेतला आहे. त्या संबंधीचे आदेश सोमवारी जारी करण्यात आले. ड्युटीतील चार तास कपात केल्याने महिला पोलिसांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी अंमलबजावणी 21 डिसेंबरपासून होणार आहे.

सर्वप्रथम नागपूर शहरात महिला पोलिसांना प्रायोगिक तत्त्वावर आठ तासांच्या ड्युटीचा उपक्रम सुरू केला होता. त्यानंतर पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी याबाबत विचार करावा अशा सूचना केल्या होत्या. संजय पांडे यांच्या सूचनेनंतर पुणे ग्रामीण पोलिसांनीही महिलांसाठी आठ तासांची ड्युटी जाहीर केली होती. त्यानंतर अमरावती शहर पोलीस आयुक्तांनीही याबाबत निर्णय घेतला होता. त्यापाठोपाठ औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी याबाबत निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, महिला पोलीस अंमलदार यांना आपले शासकीय कर्तव्य पार पाडताना त्यासोबत दैनंदिन पारिवारीक जबाबदारीसुद्धा पार पाडावी लागते. अशा प्रकारे कौटुंबिक व शासकीय अशा दोन्ही जबाबदारीचा महिला पोलीस अंमलदार यांना ताळमेळ घालावा लागतो.

Leave a Comment