Saturday, June 3, 2023

बुलढाणा जिल्ह्यातील दिव्यांग महिला बलात्कार-हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी

बुलढाणा प्रतिनिधी । हैद्राबाद येथील पाशवी बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला असताना बुलडाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद तालुक्यातील एका ५० वर्षीय दिव्यांग महिलेवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले.

या घटनेचा संताप व्यक्त करत जिल्ह्यातील सर्वपक्षीय महिलांनी बलात्कार प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याच्या आणि या प्रकरणातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी मोर्चा काढला आहे. यावेळी महिलांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत शासनाकडे त्यांच्या या दोन मागण्यांचे निवेदन पाठवले आहे. या पार्श्वभूमीवर महिलांनी आपल्या पतिक्रिया व्यक्त केल्या. पाहुयात या महिला काय म्हणाल्यात.