महिलेची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या; कराड शहरातील घटना

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कार्वेनाका परिसरातील महिलेने आत्महत्या केल्याचे शनिवारी दुपारी उघडकीस आले. सौ. मंजूषा विनोद घोडके ( रा. पोस्टल कॉलनी, कार्वेनाका, कराड) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सौ. मंजूषा घोडके यांनी घरातील बेडरूममध्ये लाकडाचे वसाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

पोलीस निरिक्षक राहुल वरूटे, पोलीस उपनिरिक्षक चोरगे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी धर्मराज बसरगी यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करत आहेत.

You might also like