Women’s Scheme: महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणाऱ्या या आहेत सरकारी योजना

0
5
Women's Scheme
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Women’s Scheme| दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. आजच्या काळात महिला फक्त कुटुंब आणि करिअर सांभाळत नाहीत, तर आर्थिक स्वावलंबनावरही भर देत आहेत. त्यामुळेच महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी योग्य गुंतवणूक पर्याय निवडणे गरजेचे आहे. हे पर्याय नेमके कोणते असायला हवे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

  1. महिलांसाठी विशेष मुदत ठेव (FD): सुरक्षित आणि स्थिर परतावा

बँका आणि वित्तीय संस्थांकडून महिलांसाठी विशेष मुदत ठेव योजना (एफडी) उपलब्ध आहेत. या योजनांमध्ये महिलांना सर्वसामान्य एफडीच्या तुलनेत जास्त व्याजदर मिळतो. काही बँका महिलांना 0.25% पर्यंत अधिक व्याजदर देतात. जोखीममुक्त गुंतवणूक हवी असेल आणि ठरावीक कालावधीसाठी स्थिर परतावा हवा असेल, तर हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

  1. म्युच्युअल फंडातील एसआयपी (SIP): लहान गुंतवणुकीतून मोठा परतावा

ज्या महिलांना गुंतवणुकीवर जास्त परतावा हवा आहे आणि दीर्घकालीन योजना आखायची आहे, त्यांच्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) हा योग्य पर्याय आहे. दरमहा लहान रक्कम गुंतवूनही चांगला नफा मिळू शकतो. विशेषतः इक्विटी म्युच्युअल फंड दीर्घकाळासाठी फायद्याचे ठरू शकतात.

  1. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF): कर बचत आणि दीर्घकालीन सुरक्षा

PPF हा महिलांसाठी अत्यंत सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणूक पर्याय आहे. यात 15 वर्षांचा लॉक-इन कालावधी असतो, तसेच सरकार यावर चांगले व्याजदर देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या योजनेतील गुंतवणूक करमुक्त असते, त्यामुळे दीर्घकालीन बचतीसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो.

  1. सुकन्या समृद्धी योजना (SSY): मुलीच्या भविष्याची सुरक्षितता

मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी बचत करण्याच्या उद्देशाने सरकारने सुकन्या समृद्धी योजना (SSY) सुरू केली आहे. या योजनेत आकर्षक व्याजदर मिळतो आणि करसवलतीचाही लाभ घेता येतो. (Women’s Scheme)जर तुमच्या कुटुंबात लहान मुलगी असेल, तर तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  1. सोने गुंतवणूक: पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड

भारतीय महिलांमध्ये सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. मात्र, आधुनिक गुंतवणुकीसाठी डिजिटल सोने, गोल्ड ईटीएफ आणि सॉव्हरेन गोल्ड बाँड (SGB) हे चांगले पर्याय ठरू शकतात. यामुळे पारंपरिक सोन्यासारखी साठवणुकीची समस्या राहात नाही आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा पर्याय फायदेशीर ठरतो.

  1. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS): निवृत्तीनंतर सुरक्षित जीवनासाठी

महिलांनी (Women’s Scheme) केवळ वर्तमानाचा विचार न करता निवृत्तीनंतरच्या आर्थिक स्थैर्यासाठीही नियोजन करणे गरजेचे आहे. राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) हा एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे, जो निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्नाची हमी देतो. या योजनेत गुंतवणूक केल्यास करसवलतीसह भविष्यासाठी आर्थिक सुरक्षितता मिळते.