Women’s T20 Challenge 2022 : सुपरनोव्हाने रचला इतिहास! सलग तिसऱ्यांदा झाले चॅम्पियन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – नुकत्याच पार पडलेल्या महिला टी20 चॅलेंज 2022मध्ये (Women’s T20 Challenge 2022) सुपरनोव्हान संघाने विजेतेपद पटकावून इतिहास रचला आहे. त्यांनी सलग तिसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावले आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हासने अंतिम सामन्यांत वेलोसिटीचा चार धावांनी पराभव करत सलग तिसऱ्यांदा विजेतेपद (Women’s T20 Challenge 2022) आपल्या नावावर केले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या या सामन्यात सुपरनोव्हाने बाजी मारली आहे.

सुपरनोव्हाने 166 धावांचे लक्ष्य ठेवले
सुपरनोव्हासच्या डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या प्रिया पुनिया आणि डायंड्रा डॉटिन या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 57 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. यानंतर प्रिया पुनिया 29 चेंडूत 28 धावा करून बाद झाली. यानंतर डॉटिन आणि हरमनप्रीत कौर यांनी डाव सावरला. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 33 चेंडूत 58 धावांची भागीदारी केली. यानंतर सुपरनोव्हान संघाने वेलोसिटी समोर 166 धावांचे लक्ष्य ठेवले.

वेलोसिटी संघाचा चार धावांनी पराभव
वेलोसिटी संघाच्या सलामीच्या जोडीने शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी जोरदार सुरुवात केली पण शेफाली तिसऱ्याच षटकात आठ चेंडूत पंधरा धावा काढून बाद झाली. यास्तिकाही जास्त वेळ क्रीझवर राहू शकला नाही. यानंतर किरण नवगिरे, नटकन चांथम, कर्णधार दीप्ती शर्मा यादेखील स्वस्तात माघारी परतल्या. यानंतर स्नेह राणा आणि लॉरा वुलफार्ट यांनी मिळून डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला आणि सहाव्या विकेटसाठी 27 चेंडूत 40 धावा केल्या. मात्र त्यांना आपल्या संघाला (Women’s T20 Challenge 2022) विजय मिळवून देण्यात अपयश आले.

हे पण वाचा

एकवीरेला चाललेल्या कारने बोरघाटात घेतला पेट, व्हिडिओ आला समोर

‘या’ देशात चक्क युरीनपासून बनवली जाते बिअर !!! तुम्ही ते पिण्याचे धाडस कराल का???

पेट्रोल पंपावर आग लागताच धावू लागले लोक, धाडसी महिलेनं वाचवला सगळ्यांचा जीव

एका महिन्यात ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांना दिला तब्ब्ल 158.59% रिटर्न !!!

Online Shopping वेबसाइट्सवरील fake reviews ना आळा घालण्यासाठी सरकारने उचलले ‘हे’ पाऊल

 

Leave a Comment